मुंबई, वृत्तसेवा, 6 जुलै 2022 : सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा”, अशी महत्त्वाची सूचना शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिली. होती. मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचे मुंबईतील निवावस्थान सिल्व्हर ओकवर ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे, पण त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन कक्षात गेले होते. त्यानंतर ते थेट पवारांच्या निवावस्थानी गेले. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकटेच होते, त्यांच्यासोबत अन्य कोणताही नेता नव्हता अशी माहिती आहे.
“महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा”, असं भाकित शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते.
“आपण राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा”, अशी महत्त्वाची सूचना शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिली. होती.