मुंबई, दी. 16 जून 2022 : राज्यात करोना रुग्णसंख्येत बुधवारी मोठी वाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात करोनाचे ४,०२४ रुग्ण आढळले. मंगळवारच्या तुलनेत ही वाढ ३६ टक्के आहे. राज्यात मंगळवारी करोनाचे २,९५६ रुग्ण आढळले होते. बुधवारी त्यात मोठी भर पडून दैनंदिन रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा पार केला.
राज्यभरात ४,०२४ रुग्ण आढळले. १२ फेब्रुवारीनंतरची ही सर्वात मोठी दैनंदिन रुग्णसंख्या आह़े मुंबईत दिवसभरात २,२९३ रुग्ण आढळले. २३ जानेवारीनंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. राज्यात गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३,०२८ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील करोनामुक्तांचे प्रमाण ९७.८९ टक्के आहे. सध्या राज्यात १९,२६१ उपचाराधीन रुग्ण आहेत.