सडक अर्जुनी, गोंदिया, दीं. १६ जून २०२२ : पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची सभा ग्रामपंचायत डव्वा येथे सौ पुष्पमाला बडोले सरपंच ग्रामपंचायत डव्वा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित १५ जून रोजी घेण्यात आली.
सभेला मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भुमेश्वर पटले, जि. प. सदस्य डव्वा क्षेत्र, शांलीदरजी कापगते, उपसभापती,प. स. सडक अर्जुनी, चेतन वळगाये प.स.सदस्य , गणेश मुनीश्वर ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत डव्वा हे उपस्थित होते.
घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकाम कसे करावे, शासकीय निधीचा गैरवापर होणार नाही, किती निधी मिळतो, कसा मिळतो अस्या अनेक बांबीवर लाभार्थ्यांना सभेत समजावून सांगण्यात आले, सभेला एकुण 83 [100%] लाभार्थी हजर होते. पाहुन्यानी सभेत लाभार्थ्यांनी ग्राम पंचायत, रोजगार सेवक, घरकुल अभियंता आणि पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपला राहण्याचा निवारा दिलेल्या मुदतीत कसा बांधता येईल याचा विचार करावा तसेच दिलेल्या मुदतीत जर मंजूर घरकुल बांध काम पूर्ण केले तर पुढील मंजूर झालेले प्रतीक्षा करणाऱ्या दुसऱ्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाची प्रक्रिया सुरू करता येईल अशी माहिती देण्यात आली.
येवढेच नव्हे तर आपले घरकुल वेळेवर बांधून सर्व सोइने युक्त घरकुल बांधून मॉडेल घरकुल स्पर्धा मध्ये भाग घेऊन गावाच्या विकासात हातभार लावावा व घरकुलाचा निधी हा घरकुल बांध कामासाठीच वापरावा असे अध्यक्षीय भाषणात सरपंच सौ.पुष्पमाला बडोले यांनी मत व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी गणेश मुनिश्र्वर यांनी केले.