- संतप्त लोकांनी ट्रक जाळला, 1 मृत्यू 5 गंभीर जखमी!
गोंदिया, दींनाक : 15 जून 2022 : अवैध वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रेक्टर यात विचित्र अपघात झाला असून अनियंत्रित टिप्पर ने अचानक ब्रेक मारल्याने ट्रेक्टर टीप्पर खाली घुसल्याने यात ट्रैक्टरचा ड्रायव्हर जागिच ठार झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील महालगांव मुरदाडा येथे आज दिनांक : 15 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता घडल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ट्रैक्टर वरील 6 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. प्रशांत धर्मराज आगासे याचा जागीच मृत्यू झाला तर गोविंद योगराज आगासे, गुलशन बलीराम कावळै, शैलेश मुलचंद भोयर, विशाल मुन्नालाल नागपूरे, उमेश शंकर आगासे असे गंभीर जखमीचे नाव आहेत.
शेतीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्याची लगभग शेताकड़े सूरु झाली आहे. असेच शेतीच्या कामासाठी महेश नागपुरे यांच्या टेक्टर मजूर घेऊन जात असतांना महालगांव मुर्दडा गावाजवळ एका वाळू तस्करी करणाऱ्या ट्रक ने ओवर टेक करत अचानक ब्रेक लावला.
यात ट्रक्टर च्या ड्राइवरला गाड़ी कंट्रोल न झाल्याने ट्रेक्टर सरळ ट्रक च्या मागच्या बाजूस घुसला. यात फसुन ट्रैक्टर ड्रायव्हर मजुराचा जागिच मृत्यु झाला. तर 5 मजूर गंभीर जख्मी झाले आहे. जख्मी लोकांना लगेच गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती कळताच लोकांनी एकच गर्दी घटनास्थळी केली. तर संतप्त लोकांनी ट्रक जाळुन टाकला आहे. यांची माहिती दवनीवाडा पोलिसांना मिळाली असून फरार आरोपी ट्रक चालकाचा शोध सूरु केला आहे. तर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रॅक्टर शेतात शेणखत खाली करून गावाकडे येत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.