बोथली च्या नाल्यातून लाखो ब्रास वाळू चोरी, तलाठी साहेबांचा हप्ता वसुली कारभार लय भारी!!  


गोंदिया, दिनांक : 13 जून 2022 : आपण हे दृश्य पाहता ते गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी येथील तलाठी कार्यालय साझा क्रमांक : 09 येथील आहेत. येथे कार्यरत तलाठी हरिदास शेंडे साहेब म्हणून आहेत. तलाठी साहेब हे खजरी येथे मुख्यालई राहत नाही असे सांगितले जाते तर ते अर्जुनी मोरगाव येथून ये जा करतात. मात्र खजरी येथे मुख्यालई राहत असल्याचे कागदावर दाखवतात. आणि शासनाकडून वर्षाला हजारो रुपयाची घरभाडे भत्ता उचल करतात. असे ही सांगितले जात आहे. विशेष सांगायचं म्हणजे एका खाजगी वेक्तीच्या घरून हा तलाठी कार्यालयाचा कारभार चालते. आणि शासकीय कार्यालय कधी मधी उघडते. तलाठ्याला हलचल रजिस्टर सह अनेक अटी शर्ती मध्ये राहून काम करणे असते मात्र कुणीही कायद्याला जुमानत नाही ही शोकांतिका आहे.

आता तलाठ्यांना कुणाची भीती राहत नसल्याने अनियंत्रित कारभार चालू असल्याचे चित्र आहे. खजरी ते म्हसवानी, बोथली मार्गावर असलेल्या चुलबंद नदीच्या नाल्यातून गेली अनेक वर्षे पासून वाळूची सातत्याने उचल चालू असल्याचे शेतकरी सांगतात. खजरी परिसरात असलेल्या या नाल्यातून वाळू सह शेतकऱ्यांच्या आता मोटार पंप देखील चोरी होत आहेत. तर नदीपात्रातील सिमेंट ने तय्यार केलेल्या विहिरी देखील मोकळ्या होत आहेत. शासनाने लाखो रुपयाचा खर्च करून नदीपात्रात विहीर तय्यार केली आहे. मात्र त्या पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच अवैध उत्खनना मुळे शेतकऱ्यांच्या जमिनी देखील नदीपात्रात सामावून जात आहेत.

शेतकऱ्यांनी सांगितले अनेक वेळा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता. या कडे हेतू परस्पर दुर्लक्षित करण्यात आले आहे. खजरी/ बोथली येथील सरपंच नरेश चव्हाण यांनी सांगितले की आपण स्वतः तहसीलदार सडक अर्जुनी यांना भेटून या बाबद माहिती दिली तर पोलिस प्रशासनाला देखील माहिती दिली मात्र यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांचे सांगणे आहे या नाल्याला नुकतेच वरून डयाम चे पाणी सोडण्यात आले होते. म्हणून वाळू उत्खनन करण्यात आलेले अनेक मोठे खड्डे बुजले आहेत. आज पहाटे सदर ठिकाणी बोथली येथील सरपंच आणि काही शेतकरी व पत्रकार पोहोचले असता वाहन धारक घटना स्थळवरून पळून गेले तर दुचाकी वाहन घटनास्थळावर होती.

एकटे शेतकरी गेले असता त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या वाहन धारक देतात असे शेतकरी दरम्यान सांगत होते. तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी अवैध वाळू वाहतुकीवर पथकाच्या द्वारे कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र तसे दिसत नाही. परिणामी हतबल झालेल्या नागरिकांनी पत्रकारांना माहिती देऊन शासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पाडण्याचे ठरविले.

रोज 24 तास या परिसरातून वाळूचा अवैध रित्या उपसा केला जाते. तर ही वाहतूक शेती मार्गाने केली जाते. रोज हजारो ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याने शासनाला लाखोंचा चुना लागत आहे. महसूल विभागाने सातत्याने अवैध महसूल वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्यास वाहनाच्या दंडापोटी शासनाला मिळणारा महसूल अधिक प्राप्त होईल मात्र तसे तालुक्यात सध्या दिसत नाही. महसूल विभाग सध्या सायलेंट मोडवर आहे.

परिणामी शेतकरी त्रासलेले आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक सरपंच नरेश चव्हाण, डेविड चव्हाण सह शेतकऱ्यांनी केला आहे. तलाठी कार्यालय खजरी साझा 09 यांच्याकडे हा परिसर येत असल्याचे सरपंच नरेश चव्हाण यानी सांगितले. तर अधिक माहिती साठी तलाठी शेंडे यांच्याशी संपर्क केला असता सदर ठिकाण आमच्याकडे येत नाही असे सांगत प्रकरणावर साहेबांनी सारवा सारवा केली आहे. मात्र साजा कुुणाकडेही येत असला तरी वाळूची वाहने खजरी तलाठी कार्यालय समोरून जातात हे विशेष आहे. आता कारवाई कुुणी करावी हा संशोधनाचा विषय आहे. रोज होत असलेल्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने कुठेतरी अधिकाऱ्यानंचे हप्ते बांधलेले असावेत अशी देखील चर्चा सुरू आहे.

टीम: महाराष्ट्र केसरी न्युज


 

Leave a Comment