गोंदिया, आमगाव, दींनाक : १२ जून २०२२ : आलोसे क्र. १ श्रीकांत पांडुरंग पवार, वय ३७ वर्ष पद सहायक पोलीस निरीक्षक, नेमणुक पो.स्टे. आमगाव व आरोपी क्र. २ खाजगी इसम श्री अनिल किसनलाल सोनकनवरे, वय ३७ वर्ष, व्यवसाय अमृत ढाबा मालक रा. गोरठा, पोष्ट ठाणा आमगाव जि. गोंदिया यांनी तक्रारदारास ५,००,०००/- रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती रु. २,००,०००/- लाच मागणी करुन सापळा कार्यवाही दरम्यान, आरोपी क. २) यास लाच रक्कमेपैकी पहीला हप्ता १,००,०००/- रु. रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले,
तक्रारदार हे शेतकरी असुन ते यापूर्वी प्लॉटची खरेदीसुद्धा करीत होते. त्यांनी मौजा आमगाव येथे प्लॉट खरेदी-विक्री केले आहेत. तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल पर फोन करून एपीआय पवार पो.स्टे. आमगाव यांनी पो.स्टे. आमगाव येथे तक्रारदार यांचे विरोधात सरकारी जमिन विकल्याचे अर्ज आला आहे. त्या अर्जासंबंधाने आपणावर गुन्हा दाखल होईल कार्यवाहीला समोर जायचे नसेल तर आपणास मला पाच लाख रुपये दयावे लागतील.
आपण पाच लाख रुपये घेऊन पोलीस स्टेशन आमगाव येथे या असे सांगुण तक्रारदारास ५,००,०००/- रुपये लाच रकमेची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
प्रस्तुत प्रकरणी आरोपी श्रीकांत पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. आमगाव यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीच्या योग्य पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान श्रीकांत पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. आमगाव यांनी तक्रारदार यांचे विरोधात पोलीस स्टेशन आमगाव येथे असलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याकरीता १५,००,०००/- रुपये ची मागणी करून तडजोडीअंती २,००,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून त्यापैकी पहीला हप्ता १,००,०००/- रुपये आरोपी खाजगी इसम अनिल किसनलालजी सोनकनवरे, रा. गोरठा याचे हस्ते स्विकारण्याची तयारी दर्शविली.
आज दि. १२.०६.२०२२ रोजी आरोपी अमृत ढाबा गोरठा आमगाव येथे आरोपी खाजगी इसम अनिल किसनलाल सोनकनवरे, रा. गोरठा यांचे वर लाचेचा यशस्वी सापळा रचण्यात आला. या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी श्रीकांत पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. आमगाव यानी तक्रारदाराकडे यांचे विरोधात पोलीस स्टेशन आमगाव येथे असलेल्या तकार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याकरीता आरोपी खाजगी इसम अनिल किसनलाल सोनकनवरे, गोरठा याचेकडे देण्यास सांगितलेली लाच रकमेचा पहीला हप्ता १,००,०००/- रुपयेची लाच रकमेची आरोपी खाजगी ईसमलाल सोनकनवरे याने पंचासमक्ष मागणी करून ती लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारुन गैरफायदा घेतला.
त्यानंतर श्रीकांत पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. आमगाव यांना ताब्यात घेवून दोन्ही आरोपीता विरुध्द पो.स्टे. आमगाव ता. आमगाव जि. गोंदिया येथे कलम ७,२२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी राकेश ओला, पोलीस अधीक्षक, मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनात पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस उपअधिक्षक, अतुल तवाई, पोलीस निरीक्षक सी. चंद्रकात करपे, पो हवा मिलकीराम पटले, संजय बोहरे, ना.पो .सि. राजेन्द्र बिसेन, मंगेश कहालकर, अशोक कापसे, संतोष शेंडे, संतोष बोपचे, मनापोशि सगिता पहले सर्व ला.प्र.वि. गोदिया यांनी केली.
नागरिकांना आव्हान करण्यात येते की, त्यांची लोकसेवका विरुद्ध तक्रार असल्यास त्यांनी प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे संपर्क करावा. त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात येईल.