गोंदिया, विशेष प्रतिनिधी, दिनांक : 24 मे 2022 : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले असल्याने शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला 100 दिवस काम देण्याची हमी दिली आहे. याच माध्यमातून जिल्हाभरात रोजगार हमी योजनेच्या कामावर 96 हजार 375 मजूर कामावर आहेत. यांच्या माध्यमातून घरकुल, पांदन रस्ता, तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, शेत तळी, गोठा बांधकाम, करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा मध्ये सध्याच्या घडीला 1124 कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहेत.