डॉ. रोशन अंड्रस्कार यांना राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराने सन्मानित


सडक /अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 24 मे 2022 : तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना सौंदड येथिल पूर्व कार्यरत डॉ . रोशन अंड्रस्कार यांना सन 2019-20 या वर्षाकरिता पशुसंवर्धन दिनानिमित्त दिनांक 20 मे 2022 रोजी पुणे येथे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आला.

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हे उपस्थित होते. प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. रोशन अंड्रस्कार यांनी मागील तीन वर्षांपासून सलग सौन्दड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लोक उपयोगी सामाजिक कार्य करून दवाखान्याचे नाव उंचविण्याचे कार्य करीत असल्याचे पशुपालकांना मोठा फायदा झाला आहे.

डॉ. अंड्रस्कार यांनी नवनवीन सामाजिक उपक्रम राबविले उदारणार्थ वृक्षारोपण करून जनजागृती करणे, शहीद जवानांच्य हुतात्माना श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित करणे, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले, पूरग्रस्त लोकांसाठी गावातील जनतेकडून निधी जमा करून पूरग्रस्त लोकांना मदत केलेली आहे.

गावातील दोन शेतकऱ्यांचे आगीत धानाचे ढिगारे जळून खाक झाले, अशाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाकरिता पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत आर्थिक मदत देण्यात आली, कोविड 19 च्या काळात दवाखान्यात येणाऱ्या पशुपालकांना कोविड रोगाचे मार्गदर्शन करून नेहमी मास्कचे वाटप करून मास्क लावण्याबाबत प्रवृत्त करण्याचे कार्य करण्यात आले.

पशुपालक यांना डॉ. रोशन अंड्रस्कार यांच्या मार्गदर्शनामुळे दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वैरणविकास कार्यक्रम व इत्यादी पशुसंवर्धन विषयक योजनांची लोकांमध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्धी प्रचार करून पशुपालकांना योजनेचा लाभ घेऊन त्यांचे आर्थिक परिस्थिती उंचविण्याकरिता भरीव मदत करण्यात आली आहे.
या कार्याबद्दल मागील तीन वर्षात सतत जिल्हात प्रथम क्रमांक व नागपूर विभागात सतत प्रथम पाच मध्ये येऊन त्यांना प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांनी प्रशस्तीपत्र देऊन उत्कृष्ट पशुवैद्यकीय सेवा देत असल्याने गुणवंत कर्मचारी म्हणून गैरविण्यात आले होते.

उल्लेखनीय पशुसंवर्धन विषयक तथा सामाजिक कार्य करीत असल्याने कार्यक्षेत्रातील पशुपालकानी उत्कृष्ठ पशुवैद्यकीय देत असल्याने आदर्श पशुवैद्यक म्हणून तालुकास्तरीय पशु, पक्षी प्रदर्शनी या प्रसंगी पशुपालकांनी मान्यवरांच्या हस्ते स्वपत्नीक स्मूतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता. डॉ अरविंद शंभरकर जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त गोंदिया, डॉ पुंडलीक बोरकर जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त वर्धा, डॉ कांतीलाल पटले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गोंदिया व डॉ प्रज्ञा डायगव्हाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वर्धा तसेच पशुचिकित्सा व्यवसायी संघटना डॉ श्रीकांत वाघाये, डॉ कल्याणी लोथे, रमेश चू-हे जि प सदस्य, सौ मंजू डोंगरावर प स सदस्य , गायत्री इरले सरपंच सौंदड तसेच पशुपालक यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. या सर्व कार्याकरिता त्यांच्या स्वपत्नी सौ युगा अंड्रस्कार यांचा मोलाचा वाटा आहे. सूत्रसंचालन डॉ अनिल देशपांडे उप आयुक्त व आभारप्रदर्शन डॉ संतोष पंचपोर उप आयुक्त यांनी मानले.


 

Leave a Comment