- ६३ ग्रामपंचायती पैकी केवळ २२ ग्रामपंचायतीचे पाणी टंचाई बाबतची माहिती प्राप्त…
सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : ०४ एप्रिल ,२०२२ : पंचायत समिति सड़क / अर्जुनी अंतर्गत ६३ ग्रामपंचायत क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टंचाई बाबतची आढावा बैठक आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १ एप्रिल २२ रोजी पंचायत समिती सडक अर्जुनीच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेस गटविकास अधिकारी डॉ . श्रीकांत वाघाये , सहाय्यक गटविकास अधिकारी खुणे, सेवानिवृत्त उपसचिव दुलाराम चंद्रिकापुरे , शिवाजी गहाणे पं. स. सदस्य , चेतन वडगाये पं. स. सदस्य , पाणी पुरवठा अधिकारी श्री वानखेडे , कनिष्ठ अभियंता श्री. बंसोड , श्री. शहारे, ग्रामपंचायतील सरपंच ग्रामसेवक तसेच वृत्तपत्राचे प्रतिनिधी हजर होते.
बैठकीस सुरुवात करताना आमदार यांनी मागील दोन वर्षात पाणीटंचाई बाबत ग्रामपंचायतींनी केलेली मागणी ही केवळ औपचारिकता पूर्ण करणारी होती , प्रत्येक गावी दोन विंधन विहिरी व हातपंप दुरुस्ती एवढीच मागणी करण्यात आली होती. पाणी टंचाई अंतर्गत एवढेच अपेक्षित नसून अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेमध्ये काही सुधारणा / दुरुस्तीच्या बाबीचा व सर्व उपाययोजनांचा अंतर्भाव करून पाणी पुरवठा योजनेचा टंचाई आराखडा सादर करावा. त्यासाठी जर अधिक निधीची आवश्यकता पडल्यास तशी राज्य शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येईल. मात्र नागरिकांना पिण्याचे पुरेसे पाणी पुरवणेबाबत सर्व ग्रामपंचायातींनी दक्षता घ्यावी अशी सूचना केली .
स. अर्जुनी पंचायत समिती क्षेत्रातील ६३ ग्रामपंचायती पैकी केवळ २२ ग्रामपंचायतीचे पाणी टंचाई बाबतची माहिती प्राप्त झाल्याचे श्री शहारे कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले, यावर आमदार मोहदय यांनी माहितीची वाट न बघता उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांचे ग्रामपंचायत मध्ये पाणी टंचाई अंतर्गत आवश्यक बाबीची मागणी बैठकीतच नोंदवावी व त्याची नोंद घेऊन त्वरित आराखडा तयार करून निधी व साहित्याची मागणी जिल्हास्तरावर करावी अशी सूचना केली.
सर्व ६३ ग्राम पंचायतीची मागणीची नोंदणी करण्यात आली. यात मुख्यत्वे नव्याने विंधन विहिरी व अस्तित्वातील विंधन विहिरीची दुरुस्तीसाठी पाईप ची मागणी करण्यात आली, सर्वच ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विधन विहिर असुन त्या आता कोरड्या पडल्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकत नाही विंधन विहिरी साठी मागणी एवढे पाईप रॉड व इतर साहित्य वेळेत पुरवल्या जात नाही त्यामुळे बऱ्याच विंधन विहिरी बंद पडल्या आहेत, या दुरुस्तीसाठी त्वरित पुरेसा साहित्याचा पुरवठा करावा अशी ग्रामपंचायत चे सरपंचानी मागणी केली, ६३ ग्रामपंचायत पैकी ४० ग्रामपंचायतींना १००० पाइप व अन्य साहित्याची आवश्यकता असुन त्यासाठी रुपये २५ लक्ष खर्च अपेक्षित आहे.
तेव्हा आवश्यक निधी व साहित्याची मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे दोन दिवसाच्या आत करावी व साहित्य प्राप्त करून आठ दिवसात प्रामपंचायतींनी साहित्याचा पुरवठा करावा यासाठी स्वतः आमदार जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याशी बोलून व पत्राद्वारे निधीची मागणी करणार असल्याचे सांगितले, हातपंप व विद्युत पंप देखभाल दुरुस्ती ची वर्गणी रुपये ८ लक्ष ७१ हजार एवढी बऱ्याच ग्रामपंचायत कडे थकीत असल्यामुळे साहित्य पुरवण्यात आर्थिक अडचणी निर्माण होतात.
असे श्री वानखेडे यांत्रिकी अभियंता यांनी सांगितले, यावर काही ग्रामपंचायतींनी १०० टक्के वर्गणी जमा केली आहे, तेव्हा वर्गणी थकित असलेल्या ग्रामपंचायतींनी धडा घेऊन वर्गणीची रक्कम भरावी, मात्र त्यासाठी साहित्य पुरवठा अथवा विंधन विहिरीची दुरुस्ती थांबविण्यात येऊ नये , पाणी म्हणजे जीवन आहे जीवन अमूल्य आहे , कोविड -१९ चे प्रार्दूभावात शासनाने कोट्यावधी रुपये लोकांचे जीव वाचवण्यासाठी खर्च केले असून , पीण्याचे पाण्यासाठीसाठी सुद्धा शासन आवश्यक तेवढा खर्च करेल.
त्यासाठी अधिकारी वर्गांनी अडवणूक करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली, ग्रामपंचायत कोसबी अंतर्गत बकी येथे अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनेमधून पुरेशा पाणी उपलब्ध होत नाही व विंधन विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या आहेत सबब ग्रामपंचायतींनी खाजगी विहिरी अधिग्रहीत कराव्यात आवश्यक तेवढे टँकर लावावेत व विहीरी अधिग्रहीत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची मागणी तहसिलदार यांचेकडे ग्रामपंचयतींनी नोंदवावी असे निर्देश दिले.
सोबतच घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला, ग्रामस्तरावरून प्राथम्यक्रमाणे पाठविलेल्या यादीत पंचायत स्तरावरून बदल करून पूर्वीप्रमाणेच यादी अंतिम झाली असल्याचे तक्रारीचे संदर्भात श्री. बन्सोड अभियंता यांनी घरकुल योजनेचे निकष , मंजुरी प्रक्रिया विषद केल ग्रामपंचायतीनी पाठविलेली यादीच ऑनलाईन करण्यात आली. मात्र संगणक प्रणालीच्या दोषामुळे ती पूर्वीप्रमाणेच येत असल्याचे निदर्शनास आल्यावर तसे डीआडीए ला कळविण्यात आल्याचे सांगितल्यावर शंकेचे निराकरण झाले.
१५ व्या वित आयोगाच्या निधीबाबतच्या सरपंचांच्या तक्ररीच्या अनुषंगाने श्री. टेंभुर्णे संगणकचालक यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच , ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे संगणक चालक यांना येत्या ८ एप्रिलला प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देश दिले, आढावा बैठक संपण्यापूर्वीच जे ग्रामसेवक , कर्मचारी व अधिकारी विना परवानगीने निघून गेले त्यांचेवर कारवाई करावी व त्या दिवशीचे वेतन कापण्यात यावे , व भविष्यात कर्मचान्यांनी शिस्तीचे पालन करण्याबाबत सुचना कराव्यात असे निर्देश गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांना दिले व सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठक संपली.