लाचखोर! देवरी प.स.गटविकास अधिकारी एसीबी च्या जाळ्यात.  


संग्रहित छायाचित्र


गोंदिया, दिंनाक : ०२ मार्च : तक्रारदार हे सदस्य असलेल्या सहकारी संस्थेकडुन देवरी तालुक्यात ग्रामपंचायतींना विविध शासकीय योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामाकरीता ग्रामपंचायती कडुन टेंडर झाल्यानंतर विविध साहीत्य पुरविण्याचे कामे संस्थेमार्फत करण्यात येते. पंचायत समिती देवरी मार्फत बिल मंजुर झाल्यानंतर संस्थेला मिळतो. संस्थेतर्फे ग्रामपंचायती कडुन टेंडर झाल्यानंतर विविध साहीत्य पुरविण्याचे व त्या कामाबाबत सर्व कार्यालयीन कामे तकरारदार पाहतात.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सन २०१७ या आर्थिक वर्षामध्ये मौजा भागी व मौजा पिंडकेपार येथे रस्ते बांधकाम व खडीकरणाचे काम मंजुर झाले होते. या कामांना ग्रामपंचायती कडुन टेंडर मिळाल्यानंतर तकारदार यांच्या संस्थेने दोन्ही ग्रामपंचायतींना या कामाकरीता अंदाजे ३८,००,००० लक्ष रुपयांचे साहीत्य पुरवठा केले होते.

वरील मनरेगा अंतर्गत दोन्ही ग्रामपंचायतीचे बिले मंजुरी करीता पाठविण्याचे तकारदाराकडुन आलोसे जी याआधी ३०,००० रुपये घेतले व उर्वरीत ६०,००० रुपये व पंधराव्या विता आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत भागी/ शिरपुर करीता मंजुर झालेल्या १०,००,००० रुपयाचे कामाकरीता सही करुन इंस्टीमेट दिल्याचा मोबदल्यात या आधी १०,००० रुपये घेतले उर्वरीत १०,००० रुपये अशी एकुण ७०,००० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदारास गै.अ. यांना लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी दि. १७.०२.२०२२ रोजी ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार नोंदविली.

लाच मागणीच्या योग्य पडताळणीअंती आज दि. २.०३.२०२२ रोजी पंचायत समिती कार्यालय देवरी जि. गोदिया येथे लाचेचा सापळा रचण्यात आला. या यशस्वी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी श्री. चंद्रमणी लक्ष्मणराव मोडक, पद गटविकास अधिकारी पंचायत समिती देवरी जि. गोंदिया (वर्ग-१) यांनी आपल्या लोकसेवक पदाच्या दुरुपयोग करुन तकारदाराची बिले मंजुरी करीता पाठविण्यासाठी व पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत मंजुर झालेल्या कामाकरीता सही करून ईस्टीमेट दिल्याच्या मोबदल्यात अशी दोन्ही कामाची तकारदाराकडे तडजोडीअंती एकुण ६५,००० हजार रुपयाची लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम रू. ६५,००० पंचासमक्ष आज दिनांक ०२.०३.२०२२ रोजी पंचायत समिती देवरी येथे आपल्या कक्षात स्विकारली. त्यावरून आरोपीविरूध्द पो.स्टे. देवरी, जि. गोंदिया येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, यांचे मार्गदर्शनात पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस उपअधिक्षक, सहा.फौ. खोब्रागडे, पो.हवा. राजेश शेंद्रे, ना.पो.शि. राजेंद्र बिसेन, मंगेश काहालकर, संतोष बोपचे, संतोष शेंन्डे, मनापोशि संगिता पटले चालक ना.पो.शि. दिपक बाटबर्वे सर्व लाप्रवि, गोंदिया यांनी केली.


 

Leave a Comment