पाण्याच्या टाकीचे स्ल्याब कोसळल्याने थोडक्यात बचावले मजूर


सडक अर्जुनी, गोंदिया, दी. २६ : तालुक्यातील ग्राम पंचायत तेली घटबोरी येथे दी. २५ रोजी मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या टाकीच्या स्ल्याब चे काम चालू होते, अश्यात ७५% तय्यार झालेली सल्याब अचानक कोसळल्याने काम करणारे मजूर थोडक्यात बचावले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ०४ वाजता दरम्यान ही घटना घडली, स्लॅब वर ३ ते ४ मजूर होते, कुणालाही गंबिर ईर्जा झाली नसून ते मजूर सुखरूप आहेत.

मात्र या घटने मुळे प्रशासनाचे पितळ उघडे पडल्याचे बोलले जात आहे, लाखो रुपयांचे निधी खर्चून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने अश्या घटना घडतात याला जबाबदार यंत्रणेवर कार्यवाई ची मागणी होत आहे, ही पाणी टाकी अंदाजे ४५ लक्ष रुयाची निधी खर्चून बांधकाम चालु आहे, संपूर्ण योजना ६५ लक्ष रुपयाची असल्याचे सांगितले जात आहे, तब्बल ४० फुटावरील स्लॅब जमीनदो्त झाल्याने तांत्रिक दृष्टया निष्क्रिय काम सुरू असल्याची चर्चा आहे, मात्र या घटनेत मजूर सुखरूप बचावले हे विशेष आहे, यावर अधिक माहिती करिता यंत्रणेशी संपर्क होऊ शकला नाही.


 

Leave a Comment