सौंदड; प्याराडाईज स्कुल येथे ‘माय मराठी सन्मान 2022’ सोहळा संपन्न, अश्लेष माडे, कु.हिना मुनेस्वर, बबलू मारवाडे सह अनेकांचा सत्कार


गोंदिया, सडक अर्जुनी, दी. 28 :  27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने राज्यस्तरीय कवी संमेलन, माय मराठी प्रतिनिधिक कविता संग्रह प्रकाशन समारंभ व सत्कार सोहळा सौन्दड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक उपस्थित होते.



यावेळी राज्यभरातून आलेल्या प्रसिद्ध कवींनी आपल्या बहारदार कविता कवी संमेलनात सादर केल्या. तसेच राज्यभरातून आलेल्या उपस्थित कवींच्या मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने माय मराठी सन्मान 2022 ने गौरव करण्यात आला. यात तालुक्यातील प्रसिद्ध व अनेक पुरस्कार प्राप्त युवक प्रीत कवी अश्लेष माडे यांचा मराठीचे शिलेदार संस्था नागपूर च्या वतीने माय मराठी सन्मान 2022 पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.



त्यामुळे त्यांनी उपस्थित मान्यवरांचे व मराठीचे शिलेदार संस्था नागपूर चे आभार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक जिल्ह्यातील कवी आल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक मा. केवलचंद शहारे व मा. किशोर बन्सोड यांनी बोलताना सांगितले, यावेळी प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप मोदी युवा उद्योजक निधी मोटर च्या सौजण्याने कार्यक्रमाचे आयोजन प्याराडाईज स्कूल सौंदड येथे करण्यात आले होते, यावेळी हर्ष मोदी सामाजिक कार्यकर्ता, प्रमुख मार्गदर्शक  प्रभाकर दहीकर वन्यजीव मार्गदर्शक नागझिरा, मुन्नाभाई नंदागवळी बाराभाटी, गायत्री ईरले सरपंच, रमेश चुऱ्हे अध्यक्ष राईसमिल सह.स.,  दुर्गेश मूर्ती न्हामुर्ते टी.व्ही.एस ट्रेडर्स, प्याराडाइज इंग्लीश स्कूल चे संचालक संतोष राऊत, यांच्या सह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.



सुवर्ण पदक विजेत्या हिना चे सत्कार


दरम्यान कार्यक्रमात कु. हिना केलाश मुनेस्वर हिचे नुकतेच जिल्ह्यात आगमन झाले, तीने नेपाळ येथे भारताचे प्रतिनिधित्व केले तिथे तिने पुन्हा स्वर्णं पदक पटकावले तीचे आत्तापर्यंतचे हे तिसरे स्वर्ण पदक आहे, काल मराठी दिना निमित्त कवी संमेलन कार्यक्रमात स्थिष्ठ मंडळाने तिचे सत्कार केले तर संदीप मोदी तर्फे तिला गिफ्ट देण्यात आले, तिने सर्वांचे आभार मानले ! पत्रकार बबलू मारवाडे यांचे मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने माय मराठी सन्मान 2022 देऊन गौरव करण्यात आला, कार्यक्रमात तब्बल 100 च्या जवळपास कवी उपस्थित होते, दरम्यान विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 



 

Leave a Comment