अभिमानास्पद! इस्राएल येथील रस्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत विचार


मुंबई, वृत्तसेवा, दींनाक – ३० जानेवारी २०२२ – भारतीय महापुरूषांचं जीवन, त्यांची विचारसरणी यांचं परदेशात देखील अनुकरण केलं जातं. त्यामध्ये प्रकर्षांने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव घेतल जातं. इस्राएलचे मुंबईतील राजदूत कोबी शोशाणी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली आहे.

इस्राएलच्या जनतेमध्ये महात्मा गांधी, इस्राएलला प्रथमच भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संगीत संजोजक झुबीन मेहता लोकप्रिय असून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम आहे, असं इस्राएलचे राजदूत कोबी शोशाणी यांनी म्हटलं आहे. भारत आणि इस्राएल यांच्यातील राजनैतिक संबंधांना 30 वर्षे पुर्ण होत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

मी स्वत: शिवप्रेमी असून महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांना भेट दिली आहे. इस्राएल येथील रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत विचार सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे. तसेच इस्राएल आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध दृढ झाल्याचा अभिमान वाटतो, असं कोबी शोशाणी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इस्राएल भारताला जलव्यवस्थापन, जलसिंचन आणि निक्षारीकरण या क्षेत्रांमध्ये सहकार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इस्राएललमध्ये परदेशातील विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक भारतातील विद्यार्थीं शिक्षण घेत आहेत. तसेच इस्राएलमध्ये वैद्यकिय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची पुस्तके हिब्रू भाषेत असली तरी इंग्रजी भाषेत उपलब्ध केल्याचं कोबी शोशाणी यांनी म्हटलं आहे.


 

Leave a Comment