मुख्यालय राहण्याच्या शासन निर्णयाला शिक्षकांचा खो, मग घरभाडे भत्ता कशासाठी ?


  • 20 किलोमीटर अंतरावरून गुरुजी 11 वाजता शाळेत येतात..!

गोंदिया, सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक – 03 जानेवारी 2022 – तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आपल्या वेळेत शाळेत 11 वाजता येतात, त्या मुळे ग्रामीण भागातील शाळेतील विध्यार्थी शिक्षकांच्या पूर्वीच शाळेच्या प्रांगणात, गेट समोर पाहण्यासाठी मिळतात, सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासन विविध यौजना दरवर्षी राबवून जनतेच्या पैशाचा खर्च करते मात्र यौजना राबविणारी यंत्रना कुचकामी असल्याने जनतेच्या पैश्याचा ऱ्यास होत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना वेळेत शिक्षक उपलब्ध असावे या साठी एक जी आर काढून शिक्षक मुख्यालई राहणे बंधनकारक केले आहे, अश्यात अशासन निर्णयाला हूल्काऊन कर्मचारी थेट 20 किलो मीटर अंतरावरून आपल्या मुख्यालई शाळेत रोज येतात, मात्र शासनाकडून महिन्याला 2 ते 3 हजार रुपये मिळणारा घर भाडे भत्ता कश्या साठी हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पिपरी येथील 2 शिक्षक नेहमीच शाळेत 11 वाजता येतात असे विदयार्थी आणि नागरिक सांगतात, या पूर्वी देखील सौन्दड जिल्हा परिषद शाळा नागरी 1 चे वृत्त आम्ही लावले आहे, त्या मुळे शिक्षकांना कुणाचाही धाक नाही यावरून लक्ष्यात येते मग शिक्षण विभागाची भूमिका काय असेल यावर जनतेचे लक्ष लागले आहे, या पूर्वी डी झेड लांडगे केंद्र प्रमुख यांना विचारणा केली होती, त्यावर त्यांनी सर्वच शिक्षक बाहेर राहतात अशी लाजिरवाणी माहिती दिली होती, म्हणजे शिक्षण विभागाला सर्व माहीत असतांहा देखील असा सावळा गोंधळ तालुक्यात चालू आहे, यावर राजकीय नेत्यांच्या देखील आशीर्वाद असल्याचे दिसून येत त्या मुळे या गंभीर बाबींवर कोणताही पाठपुरावा केला जात नाही ही शोकांतिका आहे.

ग्रामीण भागात काम करणारे शिक्षक शहराच्या ठिकाणी राहतात, रोज ये जा करतात, काही वेळा तर दुपारीच गायब होतात, तर काही बार मध्ये पाहण्यासाठी मिळतात, अशी देखील नागरिकांत चर्चा आहे, सध्या शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा अशी एकंदरीत आहे, मात्र कर्मचारी आपल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाही, परिणामी नागरिकांचे कामे वेळेत होत नाही म्हणून नागरिकांनी जागरूक होणे काळाची गरज आहे.


 

Leave a Comment