खुशाल नाकाडे यांचा अनेक कार्यकता सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक ०३ जानेवारी २०२२ – राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली असून आमचे ज्येष्ठ नेते  खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले आहे, त्यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष अधिक बळकट झाला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या सहकार्याची गरज आहे, आपले सर्वांचे सहकार्य मिळाले तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा विश्वास आमदार. मनोहर चंद्रिकापुरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

अर्जुनी/मोर जनसंपर्क कार्यालयात येथे आयोजित कार्यकता आढावा बैठक मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खा. प्रफुल्ल पटेल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून खुशाल नाकाडे आपल्या अनेक कार्यकतासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, किशोर तरोणे माजी जि.प. सदस्य यशवंत परशुरामकर , अजय शहारे, शालिक हातझोडे, अजय पाउलझगडे, नरेंद रंगारी, आर. के. जाभुळकर, श्रीराम मेंढे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment