भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद छेत्र सौन्दड येथे कार्यकर्ता सभा संपन्न.


  • काँग्रेस कार्यकर्त्यां रंजुताई भोई यांचा भाजपात प्रवेश.
  • भाजप नेत्यांनी तत्कालीन राज्य सरकारवर साधला निशाणा, निवडणूक रणधुमाळीला सुरवात. 

सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक 15 डिसेंम्बर 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या निमित्ताने कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सौन्दड येथील चांदेवार वाडा येथे आज रात्री 08 वाजता संपन्न झाला, यावेळी काँग्रेस कार्यकर्ता रंजुताई भोई यांनी भाजप पक्षात प्रवेश केला, यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचा दुपट्टा घालून स्वागत करण्यात आला.

सौन्दड जिल्हा परिषद छेत्राचे अधिकृत उमेदवार निशाताई तोडासे व सौन्दड पंचायत समिती छेत्राचे अधिकृत उमेदवार वर्षाताई शाहारे तर खोडसीवणी पंचायत समिती छेत्राचे अधिकृत उमेदवार हर्ष मोदी यांना प्रचंड बहू मतांनी विजयी करा असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने उपस्थित केशवराव मानकर भाजप गोंदिया जिल्हा अध्यक्ष, विधान परिषद आमदार परिनाय फुके, माजी मंत्री राजकुमार बडोले, अशोक लंजे तालुका अध्यक्ष, श्यामसुंदर अग्रवाल उद्योगपती सौन्दड , ओंकार टेंभुर्णे, पुरुषोत्तम निम्बेकर, सदुभाऊ विठ्ठले, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालिताई टेंभुर्णे यांनी केले, यावेळी मान्यवरांनी मंचावरून तत्कालीन सरकारवर विविध आरोप केले.


 

Leave a Comment