- महसूल विभागाचे या कडे दुर्लक्ष…!
गोंदिया, सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक – 17 नोव्हेंबर 2021 – तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वाळूचे ढीग पडलेल्या अवस्थेत आहेत, हे ढीग नेमकं कुणाचे आहेत या बाबद अद्याप कुणालाही माहिती नाही, ग्राम राका येथील शाळेच्या मुख्याध्यापक कापगते यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याला या बाबद काहीच माहीत नसल्याचे लाजिरवाणे उत्तर दिले आहे, त्याच प्रकारे तालुक्यातील अनेक शाळेच्या आवारात वाळूचे ढीग साठविलेल्या अवस्थेत आहेत, हे ढीग नेमकं कुणाचे आहे, त्यावर अद्याप स्पष्ट नाही, मात्र अवेध वाळू वाहतूक दारांनी आता वाळूची साठवणुक शाळेच्या आवारात करण्यास सुरुवात केली की काय आशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे, त्यातच यात मुख्या ध्यापकांचा हिस्सा तर नाही ना असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शाळे च्या आवारात वाळूची साठवण असून सुद्धा मुख्य ध्यापकांना या बाबद काहीच माहीत नाही हे मात्र न उलघडणारे कोडे आहे, एकंदरीत मुख्याध्यापक आणि वाळू माफियात साठ गाठ तर नाही ना अशी देखील चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे, त्या मुळे महसूल विभागाने याची तपासणी करून साठा कुणाचा आहे आणि वेध आहे की अवेध याची तपासणी करावी, तालुक्यात वाळू माफियांच्या जोर वाढला असून महसूल विभाग सुस्त अवस्थेत असल्याचे चिन्ह दिसत आहेत, या वाळूची रॉयल्ट्री तपासण्याची मागणी होत आहे.
- के.बी.गजभिये मंडळ अधिकारी, सौन्दड
त्या बाबद मला माहिती नाही, मात्र त्याची तपासणी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवू , तर मुख्यध्यापकांना सुद्धा त्या बाबद विचारणा केली जाईल, त्यांनी हा साठा कसा करू दिला त्याचे रॉयल्ट्री आहे की नाही, रॉयल्ट्री नसल्यास कार्यवाई केली जाईल.