गोंदिया, दिनांक 16 नोव्हेंबर 2021 – राजकारणात नेहमीच पक्ष प्रवेश प्रक्रिया चालू असते मात्र जुने कार्यकर्ते अचानक पक्ष सोडतात तेव्हा बरच काही विखुरल्या सारखे होते. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आज आपल्या समर्थकासंह मुबंई येथे भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.
तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हा अध्यक्ष पदाचा नुकताच राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळजनक वृत्त समोर आले, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा एका पत्रातून दिला. तर आज भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी विजय शिवणकर, बाबुलाल दोनोडे, वसंत पुराम, तुकाराम बोहरे, रामेश्वर पंधरे, अजय बिसेन, नरेंद्र शिवणकर, केशवराव भुते, भास्कर धरम शहारे, जलाल पठाण, घनश्याम कटरे, बबलू डोये व अन्य उपस्थित होते.
यावेळी भाजप चे दिग्गज नेते मंडळी देखील उपस्थित होते, त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनिल मेंढे, आमदार डाॅ.परीणय फुके, माजी मंत्री इजिं.राजकुमार बडोले, गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष केशवराव मानकर, माजी आमदार भैरसिंह नागपूरे यांच्यासह भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.