राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघीडीच्या वतीने ठाणेदाराना निवेदन


गोंदिया, अर्जुनी मोर, दिनांक – 25 सप्टेंबर 2021 – महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करुन महिलांच्या नियतीला धोका पोहचवुन केलेल्या वक्तव्याबाबत त्यांचेवर भारतिय दंड विधान कलमान्वये कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाची तक्रार राष्ट्रवादी महिला काॅग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष चित्ररेखा मिश्रा यांचे नेतृत्वात अर्जुनी मोर. चे ठाणेदार यांचे कडे करण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार 13 सप्टेंबर ला शिस्त्र जिल्हा पुणे येथे आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांचे भाषणामधे हेतुपुरस्सर राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असे वक्तव्य केलेले आहे. सदर वक्तव्याचे व्हिडिओ रेकार्डिंग ,सामाजिक माध्यम, टि.व्ही.चॅनल्स व वर्तमानपत्रात खुप मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेले आहेत. सदर वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाच्या मनामधे लज्जा उत्पन्न होवुन महिलांच्या विनयशिलतेचा अपमान केलेला आहे. व राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहचवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेला नुकसान पोहचवुन बदनामी करण्याच्या उद्देशाने करुन समाजामधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केलेली आहे.

त्यामुळे प्रवीण दरेकर यांचे वर भारतिय दंड विधान कलमान्वये गुन्हा दाखल करुन कार्यवाही करण्यात यावी. असी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी महिला काॅग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष चित्ररेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, मनिषा लाडे, वनिता मेश्राम, पुष्पा दखने, अर्चना बन्सोड उपस्थित होत्या.


 

Leave a Comment