सडक अर्जुनी तहसील कार्यालयात रिक्त पदाचे ग्रहण लोकप्रतिनिधी बग्याच्या भूमिकेत ?


  • तहसील कार्यालया अंतर्गत एकूण मंजूर पदे 45 आहेत, त्यातील रिक्त पदे 18 असून कार्यरत 27 पदे आहेत. 
  • 2 नायब तहसीलदार तर 1 तहसीलदार यांचे पद रिक्त कसा चालणार तालुक्याचा कारभार ? बदली झालेल्या नायब तहसीलदार यांच्या खांद्यावर अतिरिक्त कार्यभार?

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 25 सप्टेंबर 2021 – ( बबलू मारवाडे ) – जिल्ह्यातील सडक अर्जुनी तहसील कार्यालयात सध्या रिक्त पदाचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे, एक नाही तर तब्बल 18  रिक्त पदे असुन नागरिकांची व शालेय विद्यार्थीयांची कामे या रिक्त पदा मुळे रखडलेले आहेत, त्या मुळे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून रिक्त पदे भरण्याची कृपा करावी अशी मागणी जनतेतून होत आहे, विशेष सांगायचं म्हणजे 15 आगस्ट 1992 पासून सडक अर्जुनी तहसील कार्यालयातील संजय गांधी आस्थापना विभाग तालुका निर्मिती पासून मंजूर झालेली नाही, त्या मुळे गरीब व वृद्ध नागरिकांचे मासिक पेन्शन ची रक्कम वेळीच त्यांच्या खात्यात जमा होत नाही, एकाच कर्मचाऱ्याला या विभागातील सर्व कामे करावी लागत असल्याची कुजबुज कर्मचाऱ्यात आहे , त्या मुळे या विभागाची मंजुरी करून रिक्त पदे भरण्यात यावी अशी देखील रास्त मागणी होत आहे, रिक्त पदा मुळे तालुक्यात महसूल चोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

सडक अर्जुनी तहसील कार्यालयात महसूल आस्थापना विभागात विविध पदे रिक्त आहेत.


त्यातील मंजूर असलेली पदे व रिक्त असलेली पदे खालील प्रमाणे.


1) – नायब तहसीलदार एकूण पदे – ( 3 ) रिक्त पदे – ( 3 ) , तहसीलदार पद ( 1 ) रिक्त ( 1 ), पुरवठा विभाग आणि महसूल विभाग असे एकूण ( 7 ) अव्वल कारकून वरिष्ठ ( लिपिक ) ( सीनियर क्लर्क ) यातील एक मेडिकलवर ( 1 ) वर्षे पासून गेलेला आहे, त्या मुळे हा पद गेली 1 वर्षे पासून रिक्त आहे, कनिष्ठ लिपिक ( महसूल सहाय्यक ) एकूण मंजूर पदे ( 10 ) तर सध्या कार्यरत पदे ( 3 ) इतरत्र रिक्त पदे (7 ) , एकूण सिपाही व स्वच्छ पदे ( 6 ) आहेत तर कार्यरत पदे सध्या ( 3) आहेत यातील स्वच्छक पद 2020 पासून खाली आहे, तर शिपाई पद 2014 पासून खाली आहे असे एकूण ( 3) पदे रिक्त आहेत.

एकाच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार


एस.के. टांगसीलवार अव्वल कारकून यांच्याकडे जनरल अस्थापना शाखा, तलाठी मंडळ अधिकारी अस्थापना शाखा, वशिलबाकी नविस शाखा, ही सर्व पदे एकाच व्यक्तीकडे आहेत, तर जी.आर. जांभुळकर अव्वल कारकून प्रस्तुत कार शाखा , नायब शाखा , नाजर शाखा , अशी तीन पदे एकाच वेक्तिकडे आहेत, एवढेच नाही तर ए. बी.कडू अव्वल कारकून यांच्याकडे निवडणूक शाखा , रहियो शाखा , कानुनगो शाखा, अशी तीन पदे आहेत.

तालुक्यातील महसूल विभागात एकूण रिक्त, कार्यरत, आणि मंजूर पदे 


तालुक्यात एकूण ( 18 ) तलाठी पदे आहेत तर त्यातील ( 3 ) पदे रिक्त आहेत तर मंडळ अधिकारी ( 3 ) पदे आहेत ती सध्या कार्यरत आहेत, निवडणूक विभाग ( 1 ) नायब तहसीलदार आणि महसूल विभाग  ( 2 ) नायब तहसीलदार तर ( 1 ) तहसीलदार अशी एकूण ( 4 ) पदे आहेत, त्यातील सर्वांच्या बदल्या झाल्या मुळे सर्वच पदे रिक्त आहेत, तर sdo कार्यालय देवरी येथील नायब तहसीलदार गावळ हे अतिरिक्त सेवा सडक अर्जुनी तहसील कार्यालयात देत आहेत, वेळीच पदे न भरल्यास त्यांचा सुद्धा पद रिक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तहसील कार्यालया अंतर्गत व कार्यालायत एकूण मंजूर पदे 45 आहेत, त्यातील रिक्त पदे 18 असून कार्यरत 27 पदे आहेत.


 

Leave a Comment