रासायनिक दुकानावर तहसीलदाराची धाड, अधिक चे पैसे घेऊन शेतकऱ्यांची लूट !


  • नागरिकांनी जैन टेंडर्स दुकानाच्या विरोधात दिले तहसीलदारांना निवेदन.

गोंदिया, सालेकसा, दिनांक – 16 सप्टेंबर 2021 – ( राहुल हटवार ) – तालुक्यातील आमगाव खुर्द येथील सुभाष चौक येथील रहिवासी नितीन नरेश कुमार जैन या ट्रेडर्स रासायनिक खताच्या दुकानात काल दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी शेतकरी दुकानात गेले असता दुकानदारांनी युरिया खत उपलब्ध असतानासुद्धा शेतकऱ्यांना दिले नसून शेतकऱ्यांनी तहसीलदार सालेकसा यांच्याकडे धाव घेतली व लेखी तक्रार तहसीलदार शरद कांबळे यांच्याकडे दिली आहे.

या तक्रारीची दखल तातडीने लगेच सालेकसा पंचायत समिती चे कृषी अधिकारी सिंधराम व नायब तहसीलदार वेधि यांना चौकशी करण्याचे आदेश दिले, या दुकानात जाऊन चौकशी केले असता जैन ट्रेडर्स या दुकाणांमध्ये अंदाजे 4 ते 5 वाजेदरम्यान 220. बॅग साठा आला आहे,  सविस्तर असे की जैन ट्रेडर्स दुकानदाराकडे रासायनिक खताचा परवाना असल्यामुळे या दुकानात युरिया कीटनाशक व औषधीच्या पुरवठा असते मात्र शेतकऱ्यांकडून अधिक चे पैसे घेऊन लूट करीत आहेत.

शासन निर्णयाप्रमाणे युरिया खताची बॅग 266 किंमत आहे मात्र दुकानदार बळजबरीने दुसरे औषध देऊन 550 रुपये घेऊन लूटमार करीत आहेत, या जैन ट्रेडर्स हे दुकानदार मालामाल झाले आहेत,  एकीकडे शासन म्हणतो की शेतकऱ्यांसोबत आहे व शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही अशी घोषणा करतो मात्र दुसरीकडे काबाडकष्ट करणाऱ्या सेतकरीवर्ग यांच्यावर दुकानदार हे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे.

जैन ट्रेडर्स या दुकानात भाव फलक फाट्यावर कसल्याही प्रकारची किंमत नोंद केली जात नाही ग्राहकांना पक्के जीएसटी बिल देत नाही, दुकानदार हे किमतीपेक्षा जास्त रासायनिक खत विक्री केले जाते बिल् वर ग्राहकांची सही घेतली जात नाही, जैन ट्रेडर्स दुकानदार मासिक अहवाल कृषी विभागाला सादर करीत नाही, असे चौकशी अधिकारी सिद्राम यांच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाला आहे.

मात्र लोकजनप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी याला पूर्णपणे जबाबदार आहेत असा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे सदर जैन ट्रेडर्स रासायनिक खताचा परवाना रद्द करण्यात यावा व उच्चस्तरीय चौकशी करून दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार सालेकसा यांच्याकडे केली आहे.

निवेदन देताना आमगाव खुर्द येथील नितेश देशमुख बोदलबोडी,  यतील देवेंद्र, इशराम बहेकार, रवींद्र बहेकार, संजय हूकरे,  कोमलदेव हत्तीमारे, यादराव नागपुरे , लेखराम पातोडे , ताराचंद हत्तीमारे, प्रकाश वडगाये, सोना बहेकार यांचा समावेश आहे कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जाईल असेही निवेदन करतांना कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले


 

Leave a Comment