आ.सहसराम कोरोटे यांचे हस्ते गुणवंतांचा सत्कार


  • महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया च्या वतीने गुणगौरव बक्षीस वितरण समारंभ संपन्न. 

गोंदिया, सडक/अर्जुनी, दिनांक – 02 सप्टेंबर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया तर्फे मागील वर्षभरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गितगायन व कोरोना सारखी राष्ट्रीय आपत्ती च्या वेळी लसीकरण जणजागृती करण्याकरिता शिक्षक यांच्या कडून लसीकरण जनजागृती गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात अनेक गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग नोंदवून पारितोषिकावर आपले नाव कोरले होते. त्यांचा गुणगौरव समाजातील समाजमान्य व्यक्तीमत्वाच्या हस्ते करण्यात यावे, ज्यामुळे त्यांच्या कलागुणांना अधिक चालना मिळेल याकरिता गायत्री मंदिर, आमगाव येथे आ.सहषराम कोरोटे यांचे हस्ते गुणवंताचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला .

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अश्विन वहाणे, मूख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.गोंदिया, बागडे, सहाय्यक वित्त व लेखा अधिकारी जि. प. गोंदिया. संजय बहेकार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगाव अशोक पाटील, नायब तहसीलदार, आमगाव
एम.एल.मेश्राम, गटशिक्षणाधिकारी पं.स.आमगांव
निलकंठ शिरसाटे, गटशिक्षणाधिकारी पं.स.गोरेगाव
एस.जी.वाघमारे, गटशिक्षणाधिकारी पं.स.सालेकसा
किशोर डोंगरवार, जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती गोंदिया , संदीप मेश्राम, जिल्हासरचिटणीस , डी. एच. चौधरी,जिल्हाकार्याध्यक्ष
महेश ऊके,सामाजिक कार्यकर्ते आमगाव यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कोरोना लसीकरण जनजागृती स्वरचित काव्य गायन स्पर्धेत प्रथम अस्मिता खोब्रागडे, द्वितीय सुनीलकुमार शिंगाडे, तृतीय सुधीर खोब्रागडे, स्वरचित भीमगीत गायन स्पर्धा यात प्रथम कु.अस्मिता पंचभाई, द्वितीय संयुक्तरीतीने यज्ञराज रामटेके, रेखा शहारे, तृतीय क्रमांक किरण कावळे, काव्यलेखन स्पर्धेत प्रथम चंद्रकांत लांजेवार ,द्वितीय संयुक्तरितीने राजेंद्र बनसोड ,मुरलीधर खोटेले ,सत्यवान गजभिये मुरलीधर खोटेले, सुनंदा ब्राह्मणकर , भारती तिडके ,संदीप मेश्राम, दीक्षांत धारगावे, महेंद्र रहांगडाले, सुनंदा किरसान, वैशाली चौधरी, यज्ञराज रामटेके, मंगेश मेश्राम, पि. संतोषकुमार, डी एन गोप्लीवार, बी. एन. काळसर्पे , मनोज गेडाम, एम. वाय. मेश्राम, जे एम टेंभरे, उमेश रहांगडाले,सुरेश बोंबाडे, संगीता रामटेके, देवेंद्र नाकाडे, नामदेव पाटणे, लक्ष्‍मण आंधळे, पुंडलिक हटवार, अनील कान्हेकर इत्यादी गुणवंताचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात आँनलाईन अभ्यासमाला राबवून विद्यार्थ्यांना अविरतपणे ज्ञानाचा झरा पोहचविणारे उपक्रमशील शिक्षक महेंद्र रहांगडाले , जयपाल ठाकूर ,सेवकराम रहांगडाले व अंजन कावळे , संदीप तिडके यांचा प्रशस्तीपत्र , सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते एन. बि. बिसेन सर यांच्या 53 व्या वाढदिवसाचा योगायोग निमित्त त्यांना केक कापून , पुष्पगुच्छ देऊन निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कार्यकारीणी सदस्य संदीप तिडके यांनी तर कार्यक्रमचे स्वागताध्यक्ष एन बी बिसेन संचालक होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. आय. रहांगडाले, अनिल टेभूर्णीकर , .बी एस केसाळे यांनी केले तर डी.वी.बहेकार यांनी याप्रसंगी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आमगाव च्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले, जिल्ह्याच्या काना-कोप-यामधून आलेले बहुसंख्य शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते. यावेळी किशोर डोंगरवार, संदिप मेश्राम, एन.बी. बिसेन, संदिप तिडके, डी. एच.चौधरी, कैलाश हांडगे, वाय. पी.लांजेवार, शरद उपलपवार , अनुप नागपुरे, दिक्षा फुलझेले, दिनेश बिसेन, किरण बिसेन, एस डी नागपुरे , क्रिस कहालकर, दिलीप लोधी, किशोर लंजे, विलास डोंगरे, शतिश दमाहे, जी सी बघेले, गजानन पाटणकर, विनोद बहेकार, प्रदीप बडोले, महेश कवरे, मंगेश पर्वते,जे बी कर्हाडे, ओ बी मस्के,नरेंद्र सुरजजोशी, एम. पी. म्याकलवार,बी बी मेंढे,नजिर शैख,आर एन राठोड,उत्तम गजभिये,आर एच ठाकरे,नोकलाल शरणागत, दिपक कापसे , मिथुन चौहान, ऊ एम बागडे, बी आर खोब्रागडे,तेजराम नांदेश्वर, हिरलाल सोनवाने, एस ए कुरेशी,एस ए शैख, सह बहूसंख्येने जिल्ह्यातील शिक्षक बंधू/भगिनी उपस्थित होते.


 

Leave a Comment