पिपरी (राका) गावामध्ये मोहल्ला लर्निंग वर्ग सुरू – स्वयंसेवक प्रकाश ऊके यांचा पुढाकार


गोंदिया, सडक अर्जुनी, राका, ( सुधीर शिवणकर ) , दिनांक 02 सप्टेंबर – कोरोनाच्या या संकटकाळात “शाळा बंद पण शिक्षण सुरू” या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम पिपरी (राका) या गावांमध्ये ‘प्रकाश ऊके’ या स्वयंसेवकानी इतर स्वयंसेवकांच्या मदतीने, पालकांच्या सहकार्याने आणि शाळा व्यवस्थापन समिती, पिपरी च्या प्रेरणेने मोहल्ला लर्निंग वर्ग सुरू केले असून स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत.

सदर मोहल्ला लर्निंग वर्गाला ग्रामपंचायतचे सरपंच राजेश रामटेके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास तरोने आणि ग्रामपंचायत सदस्या यामिना मेंढे, यांनी सदिच्छा भेट दिली. या मोहल्ला लर्निंग वर्गामुळे शाळा बंद च्या या काळात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासा विषयीची गोडी निर्माण होत आहे. गावातील विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने या मोहल्ला लर्निंग वर्गाची निश्‍चितच मदत होत असल्याचे मत पालकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले.


 

Leave a Comment