मुंबई येथे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा आढावा.


गोंदिया, दिनांक – 02 सप्टेंबर – जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्रालय, मुंबई येथे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत 01 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीस उपस्थित राहून कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचनाच्या सोयी सुविधा, त्वरित पूर्ण व्हावेत या करिता अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले . भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चा पाणी चोरखमारा व बोदलकसा तलावात सोडने, धापेवाडा उपसा सिंचन टप्पा ३चा निर्मितीत मंगेझरी , कटंगी, कालपाथरी सहित अन्य तलावात पाणी सोडून सिंचन क्षमता वाढवणे , सुरेवाडा उपसा सिंचन लिफ्ट एरिगेशन वर पम्प हाऊस निर्माण करणे, गणेशपूर लिफ्ट एरिगेशन तयार करून बावनथडी प्रकल्पाचा उजव्या मुख्य कालव्याचे वितरिका निर्माण करणे.

चुलबंध मध्य प्रकल्प डावा कालवा, धारगाव उपसा सिंचन , चांदपूर जलाशयातील कॅनल दुरुस्ती करून सिंचन वाढविण्या साठी इतर सिंचनाच्या बाबतीत सुद्धा सूचना खासदार प्रफुल पटेल, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मंत्रि महोदयांसमोर मांडल्या. या बैठकीत आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, विकाअ – जलसंपदा विभाग, प्रकल्प सचिव , विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता व भंडारा व गोंदिया जिल्यातील जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment