आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न


गोंदिया, अर्जुनी मोर, दिनांक – 27 ऑगस्ट 2021 – अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते केशोरी जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम परसटोला – येथे जिल्हापरिषद शाळेचे ( नवीन वर्ग खोली ) इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच ग्रामपंचायत परसटोला रामोजी कुंभरे , अर्जुनी/मोर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष योगेश नाकाडे , एफ आर टी शहा, कुंडलिक कोवे, युवराज गहाणे, भजन शहारे, धनराज नेवारे, ज्ञानेश्वर गेडाम, गोपाल लोथे, गिरीधर रक्षा ,प्रीतम रामटेके, विकास रामटेके, प्रणय शेंडे भूषण शेंडे व अन्य  मान्यवर गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment