वाळू वाहतुकीमुळे परसोडी गाव मार्गाची दयनीय अवस्था.


  • परसोडी गाव मार्गा चे चित्र…

रॉयल्ट्री परसोडी ची आणि वाळू फुटाळा/सौन्दड च्या चुलबंद नदी ची असे कसे हो साहेब…?


गोंदिया, भंडारा, दिनांक – 27 ऑगस्ट 2021 – ( बबलू मारवाडे ) – साकोली तालुक्यातील ग्राम पंचायत परसोडी अंतर्गत येत असलेल्या गाव मार्गाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका अंतर्गत ग्राम परसोडी येथील 2020 – 2021 अंतर्गत चुलबंद नदीचे वाळूघाट लिलाव झाले, चुलबंद नदीच्या पात्रातील वाळू अवजड वाहनांच्या माध्यमातून वाहतूक केली जाते, ती वाहने माहामार्गांने न जाता, गाव मार्गाने चालतात, त्या मुळे गाव मार्गाची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे, परसोडी वाया सौन्दड असा मार्ग ठरला असून राका , चिखली, कणेरी, नवेगावबांध अशी ही वाहने चालतात.


  • सौन्दड परसोडी मार्ग…

या मार्गाने रात्रोन दिवसा ट्रॅक्टर व ट्रक च्या माध्यमातून वाळूची वाहतूक केली जाते, त्या मुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अश्यात गाव मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे, गाव मार्गाच्या दुरुस्थीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.


  • सौन्दड /फुटाळा परिसरातील चित्र…

त्यातच परसोडी येथील रायल्ट्री चा वापर करून सौन्दड /फुटाळा येथे बेल बंडीच्या माध्यमातून चुलबंद नदी च्या  पात्रातील वाळू चा साठा दिवसाला करून रात्री ट्रक मध्ये जेसीबी च्या माध्यमातून भरून अवेध रित्या विक्री केली जात आहे, एकंदरीत रॉयल्ट्री परसोडीची आणि रेती सौन्दड /फुटाळा येथील आहे, परिसरात कोण आला आणि कोण गेला यावर नजर ठेवण्यासाठी खास रोजंदारीचे माणसे असतात, याकडे स्थानिक प्रशासन का लक्ष देत नाही हा मात्र संशोधनाचा विषय आहे.


 

Leave a Comment