उत्कृष्ट पशुपालक म्हणून सत्कार मात्र आजपर्यंत जनावरांचा गोठा का मंजूर नाही?


  • पशु मेळावा आयोजित करून उत्कृष्ट पशुपालक म्हणून गौरविण्यात येते, पण जनावरांचा गोठा मंजूर होत नाही.

गोंदिया, सडक अर्जुनी, सौन्दड, दिनांक – 24 ऑगस्ट 2021- ( भामा चुर्हे ) –  तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी आहेत. तसेच गटामार्फत पशुपालन करणारे गट आजही गोठ्यापासून वंचित आहेत. गरजू गरीब शेतकरी व शेतमजूर यांना जनावरांचा गोठा न देता सदन‌ लोकांकडे गोठा असूनसुद्धा त्यांनाच गोठ्याचे वाटप करण्यात आल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

पंचायत समिती अंतर्गत पशु मेळावा आयोजित करून उत्कृष्ट पशुपालक म्हणून पशुपालन शेतकऱ्यांना गौरविण्यात येते. पण त्यांना जनावरांचा गोठा मंजूर करण्यात येत नाही. ही शोकांतिका आहे. सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील गरजू लोकांना गायी, म्हशी देण्यात आल्या आहेत. ज्यांना गोठ्याची गरज आहे, अशा लोकांना गोठा न मिळता ज्यांचेकडे पूर्वीचे गोठे आहेत,  त्या सदन लोकांना जनावरांचे गोठे देण्यात आले. मागिल १०-१२ वर्षांपासून सौंदड येथील लताबाई राजकुमार ठाकरे या महिलेकडे ५ म्हशी व १५ शेळ्या आहेत, अशी माहिती मीडिया प्रतिनिधीला दरम्यान दिली आहे.

त्यांनी अनेकदा ग्रामपंचायत मध्ये गोठ्याची मागणी केली. पण त्यांना आजही गोठा मंजूर करण्यात आला नाही. मागिल १०-१२ वर्षांपासून पंचायत समिती मार्फत गोठ्यासाठी पैशाची लेनदेन करून धनिक लोकांना गोठा मंजूर करून दिला जातो असा देखील आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. लताबाई राजकुमार ठाकरे यांचेकडे आधी १० म्हशी होत्या, पण गोठा नसल्याने त्यांना ५ म्हशी विकाव्या लागल्या. आजघडीला लताबाई कडे ५ म्हशी व १५ शेळ्या असून त्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून घर सुद्धा मोडके-तोडके व जीर्ण अवस्थेत आहे.

घर बांधण्याची परिस्थिती नाही तर जनावरांसाठी गोठा कुठून बांधणार. १० वर्षांपासून घरासमोर अंगणात मांडव टाकून म्हशी व शेळ्या बांधतात. शासन अशा गरजू लोकांना गोठा मंजूर न करता लोकप्रतिनिधी आपले जवळील सधन कार्यकर्त्यांना गोठा मंजूर करवून घेतात. विशेष म्हणजे, गावात सर्व्हे करून गरजू लाभार्थ्यांना ही योजना द्यायला पाहिजे. पण असे होत नाही. अधिकारी डोळ्यांवर पट्टी बांधून सह्या मारून लोकप्रतिनिधींचे जवळील लोकांचे गोठे मंजूर करतात.

असा प्रकार पंचायत समिती अंतर्गत सुरू असल्याचे बोलले जाते. लताबाई ठाकरे यांचे म्हणणे आहे की, मला राहण्यासाठी घर नाही. तर जनावरांचा गोठा कुठून बांधणार. ५-७ वर्षांपासून गोठ्याची मागणी करून सुद्धा गोठा मंजूर न झाल्याने जवळील ५ म्हशी विकून टाकल्या. सरकार आंधळे असून लोकप्रतिनिधी बहिरे झाले आहेत, अशी खंत व्यक्त केली. आता या योजनेची आस सोडून दिली आहे. एकीकडे शासन गरजू लाभार्थ्यांना योजना दिल्याचे कागदावर दाखवून आपली प्रशंसा करीत आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी शासनाची दिशाभूल करीत आहेत.


शेती नसल्याने बॅंक कर्ज देत नाही.

आणि कर्जासाठी बॅंकेत सातबारा मागतात. २० वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यावेळेश वडीलांनी म्हैस दिली होती. त्या एका म्हशीवरून‌ प्रत्येक वर्षी म्हैस घेऊन सन २०१६ मध्ये माझ्याकडे १० म्हशी होत्या. पण घरी गोठा नसल्याने प्रत्येक वर्षी एक-एक म्हैस विकत गेले. आजघडीला ५ म्हशी व १५ शेळ्या बक-या आहेत. शेळ्या व म्हशी मांडवात बांधत आहे. सन २०२० मध्ये पशुसंवर्धन विभाग जि.प.गोंदिया अंतर्गत पशु मेळावा आयोजित करण्यात आले होते. त्यात पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत उत्कृष्ट पशुपालक म्हणून स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पण मागिल १० वर्षांपासून गोठ्याची मागणी करून सुद्धा गोठा मंजूर करण्यात आले नाही. एकीकडे उत्कृष्ट पशुपालक म्हणून सत्कार करून स्वत:ची अधिका-यांनी पाठ थोपटली. परंतू अधिका-यांनी आजपर्यंत गोठा मंजूर केला नाही

  • लताबाई राजकुमार ठाकरे पशुपालक शेतकरी सौंदड 

 

Leave a Comment