गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – १५ ऑगस्ट २०२१ – मा.आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे मुळ गाव असलेल्या बाम्हणी / सडक येथे ग्रामपंचायत क्षेत्रातील लेखाशिर्ष २५१५ , आमदार निधी , जनसुविधा व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठीच्या योजनेतून मंजूर सर्व कामांचे भुमिपुजन मा.आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे हस्ते दि . १३ ऑगष्ट २०२१ रोजी स . ११. वा . करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना सरपंच सरीता तरोणे यांनी गावाच्या विकासासाठी आमदार महोदयांनी विविध विकास कामांना मंजूरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून गावाचा विकास साधला जाणार असल्याबद्दल आमदार महोदयांचे आभार मानले, नागरिकांच्या सार्वजनिक विकासाच्या ज्या – ज्या मागण्या असतील त्या सर्व सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आमदार महोदयांनी आश्वासीत केले.
कार्यक्रमास बाम्हणी येथील प्रतिष्ठित नागरीक व से.नि. उपसचिव दुलाराम चंद्रिकापुरे , सरपंच सरीता तरोणे , किसान सभेचे जिल्हा महासचिव एफ.आर. टी . शहा , उपसरपंच विंकल शहारे , ग्रा.प. सदस्य , दामोदर तागडे , ज्योती राऊत , माधुरी तागडे , दीपा लांजेवार, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन माधव तरोणे यांनी केले तर आभार ग्रामसेवक आंबेडारे यांनी मानले.