आज रानभाजी विक्री महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 12 ऑगस्ट 2021 – पावसाळा सुरू झाला की रान भाज्या उगवायेला सुरुवात होते. रानभाज्या म्हणजे खऱ्या अर्थाने रान मेवाच म्हणावा लागेल. जनते मध्ये रानभाज्या विषयी जनजागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आज रोजी 12 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय सडक अर्जुनी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांचे संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी येथे रानभाज्या विक्री महोत्सव घेण्यात आला.

महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार श्रीमती उषाताई चौधरी यांचे शुभहस्ते, एफ आर टी शहा अध्यक्ष तालुका शेतकरी सल्लागार समिती, अशोक पाथरिकर तालुका कृ.अधिकारी, दुलाराम चंद्रिकापुरे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला तालुका शे.स.समितीचे सदस्य प्रभुजी डोंगरवार,पुष्पमाला बडोले,अलका कापगते, तसेच व्यवस्थापक राखी कहालकर ,मेंढे ताई कृषी अधिकारी, पलिंद्रा अंबादे, विस्तार अधिकारी उगले, पं. स.कृषी अधिकारी, म्हस्के, उमेदचे अधिकारी व त्यांचे सहकारी, माविम च्या सर्व सहयोगिनी, सर्व कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते. तालुक्यातून बऱ्याच महिला व पुरुष यांनी आप आपल्या भागातील रानभाज्या विक्री करिता आणल्या.

त्यामध्ये बांबू, लसन भाजी, कुडीची, सुरण, रान काकडी, अंबाडी भाजी, तरोटा, रानधोपा, शेवगा, आळंबी वेगवेगळी कंद असे अनेक प्रकारच्या भाज्यांचे स्टाल होते.


 

Leave a Comment