1 लाख 10 हजाराची लाच ! मागणाऱ्या उपविभागीय अधिकारी अडकल्या एसीबीच्या जाळ्यात!


उस्मानाबाद, वृत्तसेवा, दिनांक – 29 जुलै 2021 – भूम, उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. भूमच्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांना चतुर्थ कर्मचाऱ्याकरवी 20 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (२८ जुलै) रंगेहात पकडले आहे. महिना 1 लाख 10 हजार रूपयांची मागणी करण्याबाबत उपविभागीय अधिकार्यांना अटक करण्यात आली आहे.

ताकमोडवाडी ता.परंडा येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू विक्रेत्यास व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. यामध्ये महिना 1 लाख 10 हजार रूपयांची मागणी करण्यात आली असून त्यानंतर महीन्याला 90 हजार रुपये ठरविण्यात आले होते. उपविभागीय कार्यालय भूम येथे प्रतिनियुक्त असलेल्या कोतवालाकरवी ही रक्कम स्वीकारताना उपविभागीय अधीकारी मनीषा राशिनकर यांना पकडले आहे.

मंगळवारी (२७ जुलै) ही कारवाई करण्यात आली, तक्रारदार वाळूची वाहतूक करतो, वाळु वाहतुक सुरक्षित चालू देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांनी कोतवाल विलास जानकर यांच्या कर्वे तक्रारदाराकडे एक 1 लाख 10 हजाराची लाच मागितली होती त्यात तडजोड करुन 90 हजार रुपये ठरवण्यात आले, त्यातील पहिला हप्ता 20 हजार रुपये देताना तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यापूर्वी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला होता.

उपाध्यक्ष श्री प्रशांत संपते यांनी या तक्रारीची खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेनुसार २७ जुलै, मंगळवारी सायंकाळी ६:५९ मिनीटे वाजण्याच्या सुमारास भूम शहरातील अहमदनगर रोडवरील आयडीबीआय बँकेच्या जवळ असलेल्या चहाच्या टपरीच्या जवळ सापळा रचला आणि पहिला हप्ता, २० हजार रुपये कोतवाल विलास जानकरला लाचेचा रकमेसह ताब्यात घेतले. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह,कोतवाल विलास जानकर यांच्या विरुद्ध भूम पोलीस ठाण्यात आज (२८ जुलै) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींविरुद्ध कारवाईसाठी सापळा, अधिकारी श्री प्रशांत संपते, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.विभाग उस्मानाबाद यांचा समावेश होता. या कारवाईसाठी मा.डॉ. राहुल खाडे पोलीस अधीक्षक, ला.प्र. विभाग औरंगाबाद, मा.ब्रह्मदेव गावडे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.विभाग औरंगाबाद यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.


 

Leave a Comment