सौन्दड गाव विकासाच्या उंबरठ्यावर ?


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 29 जुलै 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड गाव सध्या विकासाच्या उंबरट्यावर उभे असल्याची चर्चा जोमात चालू आहे, मला निवडून द्या मी गावाचे नंदनवन बनवणार अश्या विविध पोकळ अस्वासने लोक प्रतिनिधीनी जणतेला देऊन सत्तेत आल्या चे बोलले जाते, मात्र सौन्दड गावाचे नंदनवन नाही तर गाडगा बन झाल्याचे काहीसे चित्र दिसत आहे, गावातील विविध ठिकाणी मुख्य मार्गावर खड्डे पडले आहेत, त्यात मुरूम टाकून बुजवण्या पेक्षा सिमेंट चे टाकाऊ निकृष्ट दर्जाचे मटेरियल मार्गावर टाकण्यात आले आहे.

तर त्याचे लेवलिंग न करता तसाच टाकून दिल्याचे चित्र 4 दिवसा पासून दिसत आहे, या सिमेंट च्या गाडग्या वरून ( ढेपला वरून ) वाहन चालक अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, सौन्दड येथील मामा तलावाच्या परिसरात असलेले अशोका कंपनीचे सिमेंट चे  ब्लॉक एका कंत्राट दाराने 1 लाख रुपयात लिलावात घेतले, ब्लॉक तोडून त्यातील लोखंड वाहानाच्या माध्यमातून वाहून नेले, उरलेला सिमेंट मटेरियल हा स्थानिक कंत्राट दार यांना दिल्याचे सांगितले जाते, मात्र त्या सिमेंट च्या टाकाऊ मटेरियल साठी स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी महाभारत घडवून आणल्याचे कंत्राटदार सांगतात.

त्यातच टाकाऊ मटेरियल स्थानिक लोक प्रतिनिधी गावात पडलेल्या खड्यांमध्ये टाकत असल्याची चर्चा आहे, मात्र त्याचे लेवलिंग न करता नागरिकांना अडकून पडण्यासाठी तसाच ठेवला आहे, परसोडी मार्गावर सुद्धा मोठे जीवघेणे खड्डे पडले असून एका वाहन धारकाच्या वाहनाचे एक्ससेल तुटले होते, सौन्दड राष्ट्रीय महामार्ग ते बाजारवाडी परसोडी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था गेली 4 वर्षे पासून दिसत आहे, त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र केसरी न्यूज सातत्याने करीत आहे.

मात्र स्थानिक लोक प्रतिनिधींचा काहीच योगदान यात दिसत नाही, त्या मुळे विकासाचे आस्वास देणार्यानी विकास कुठे गहाण ठेवला की काय ? असे चित्र दिसत आहे, लोक प्रतिनिधी विकास कामे न करता गावातील जनतेशी राजकारण करण्यात वेस्थ असल्याचे चित्र आहे, चार वर्षाचा कालावधी लोटला असून एका वर्षात सौन्दड गावचे नंदनवन आता  होणार काय ? अशी देखील चर्चा जनतेत रंगू लागली आहे.


 

Leave a Comment