गोंदिया, दिनांक – 21 जुलै 2021 – नक्षल शहिद सप्ताह -2021 चे पार्श्वभुमीवर गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक विश्व पानसरे गोंदिया, अशोक बनक अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, जालींधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 21 जुलै 2021 ते दिनांक 25 जुलै 2021 या कालावधीत नक्षल दमन विरोधी सप्ताह 2021 राबविण्यात येत असुन पोलीस स्टेशन डुग्गीपार तर्फे
दि. 21/07/021 रोजी मौजा मोगरा येथे आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे दृष्टीकोनातुन शासनातर्फे राबविण्यात येणा-या विविध योजना बाबत तसेच झाडे लावण्यापासुन मिळणारे फायदे याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करुन वृक्षारोपण सपोनि. संजय पांढरे पोलीस स्टेशन डुग्गीपार यानी केले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास सरपंच मोहन सुरसाउत, तमुंगा अध्यक्ष रेखलाल टेकाम, पोलीस पाटील श्री पुरनलाल कोडापे, ग्रामपंचायत सदस्य व ईतर गावातील नागरीक व पोलीस स्टेशन डुग्गीपारचे सपोनि. संजय पांढरे, पो.उपनि. विनोद भुरले व पोलीस कर्मचारी हजर होते.