चार वर्षे पासून सौन्दड ग्रा.प. पत्रकाराची लेखनी बंद करण्याच्या प्रयत्नात – भामा चुर्हे


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 10 जुलै 2021 – सडक अर्जूनी तालुक्यातील सौंदड ग्रा.प.अंतर्गत पाणीपुरवठा योजना माहे मे महिन्यात बंद पडली, त्यामुळे गावात पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाली, पाण्यासाठी महिलांना बोअरवेल व विहीरीवरून पाणी आणावे लागत होते.

सौन्दड ग्राम पंचायत अपाइज झाल्या मुळे, एक समाज सेवक पाणी टयांकर वर आपल्या कार्यकर्त्यांची फोटो लावून, गावात नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करतान्हा चे छायाचित्र.


तसेच ग्रा.प.ने मागिल तीन वर्षांपासून सार्वजनिक नळ बंद केल्यामुळे मध्यम व गरीब वर्गाला बोअरवेल व विहीरीचा आसरा घेऊन पाण्याची गरज भागवावी लागते, याबाबतीत पत्रकार भामा चु-हे व बबलु मारवाडे यांनी वृत्तपत्रात बातमी लावली असता, सौंदडच्या सरपंचा गायत्री ईरले यांनी ३०/६/२०२१ ला ग्रा.प.च्या मासिक सभेमध्ये पत्रकार भामा चु-हे व बबलु मारवाडे हे दोघे  खोट्या बातम्या लावून ग्रा.प. च्या कामात अडथळा निर्माण करतात.

पिण्याच्या पाण्यासाठी सौन्दड वासीयांची शेताकडे वणवण.


तसेच गावातील लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करतात, असे आरोप करीत, सौंदड ग्रा.प. येथील सरपंचा अप्रशिक्षित ग्रा.प. सदस्यांसोबत पत्रकार भामा चु-हे व बबलु मारवाडे यांची बदनामी करून लेखनी बंद पाडण्याचा डाव रचत आहेत, असा आरोप पत्रकार भामा चु-हे यांनी केला आहे. मागिल अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती. मात्र या चार वर्षांत कधीही टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची सोय ग्रा.प. प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती.

तसेच या चार वर्षांत करोडो रुपयांचे निकृष्ट दर्जाचे कामे ! करण्यात आली, आणि ही विकास कामे ग्रामपंचायत नी केले, आता सौंदड मध्ये नागरिकांचे जलदूत असल्याचे सांगून नागरिकांना निःशुल्क टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करीत आहेत. तेही निःशुल्क पाणीपुरवठा टॅंकर द्वारे करीत असून त्यावर जनशक्ती युवा पॅनेलचे फलकावर सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे फोटो लावून पाणीपुरवठा करीत होते.


या प्रकाराबाबत पत्रकार भामा चु-हे यांनी २९ जून ला वृत्तपत्रात बातमी लावली होती. पण वृत्तपत्रात बातमी लागण्यापूर्वीच निःशुल्क पाणीपुरवठा करणारे जलदुत रोशन शिवणकर यांनी भामा चु-हे व बबलु मारवाडे यांचे विरोधात १९/६/२०२१ ला ग्रा.प. सरपंच याकडे तक्रार केली. आणि यांचे त्रासामुळे निःशुल्क पाणीपुरवठा बंद करीत असल्याचे सांगितले. सरपंच व रोशन शिवणकर व अप्रशिक्षीत ग्रा.प.सदस्य हे पत्रकार भामा चु-हे व बबलु मारवाडे यांची खोट्या बातम्या छापतात म्हणून बिन बुळाचे आरोप करून बदनामी करीत आहेत.


तसेच त्यांची लेखणी बंद करण्याच्या प्रयत्न गेली चार वर्षे पासून  करीत आहेत. यापूर्वीसुद्धा सरपंच यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना पुढे करून पत्रकारांवर कोट्या अट्रासिटी अंतर्गत डुग्गीपार पोलिश स्थानकात गुन्हा नोंदवून त्याची लेखनी बंद करण्याचा प्रयत्न केला होता ही बाब गावात संपूर्ण जनतेला माहीत आहे.


मागिल ४-५ वर्षात येथील वार्डात २०-२५ बोअरवेल बसविण्यात आल्या होत्या, तरी सौंदड गावात पाण्याचा दुष्काळ कसा? उन्हाळ्यात व आता पावसाळ्यात सौंदड गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, याला कारणीभूत कोण? नळाला सुद्धा पाणी येत नाही. अशी बातमी वृत्तपत्रात लावली यात गैर काय ?  आहे. वृत्तपत्रात बातमी लागल्यावरच सौंदड ग्रा.प. प्रशासनाला जाग येते. पण उलट ग्रा.प. प्रशासन ग्रा.प. च्या विरोधात बातम्या प्रकाशित करतात म्हणून, गावातील पत्रकाराला खोट्या बातम्या प्रकाशित करतात म्हणून , बदनाम करून त्यांची लेखणी बंद करण्याचा डाव रचत आहेत.


पाणी ही नागरिकांची मुलभूत व दैनंदिन गरज असून नागरिकांना पावसाळ्याचे दिवसातसुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यास ग्रा.प.प्रशासन निष्क्रिय ठरले आहे. आणि हेच स्वयं:घोषीत जलदूत बनून गावातील मोजक्याच वार्डात टॅकरद्वारे पाणीपुरवठा करीत होते व गावात विकासाची गंगा वाहत असल्याचे नागरिकांना सांगून ग्रा.प. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निःशुल्क पाणीपुरवठा करीत होते.

बातमी लागल्या मुळे नाली उपसा केला पण गाळ उचलायला मुहूर्त मिळे ना त्या मुळे नालीतील गाळ पावसाच्या पाण्याने पुन्हा नालीत जात आहे, त्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.


तसेच या चार वर्षांत ग्रा.प.अंतर्गत विकासाचे नावावर निकृष्ट दर्जाचे कामे कंत्राटदार म्हणून केले. आणि वृत्तपत्रात बातमी प्रकाशित होण्यापूर्वीच ग्रा.प.सरपंचा यांनी भामा चु-हे यांचे त्रासामुळे निःशुल्क पाणीपुरवठा बंद करीत असल्याची तक्रार करून पत्रकाराची लेखनी बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे,  असा आरोप भामा चु-हे यांनी केला आहे.


 

Leave a Comment