- जिल्हाधिकारी कार्यालय समोर माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
गडचिरोली, प्रतिनिधी, दिनांक – 08 जुलै 2021 :- शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील मुख्यधापक यांची तक्रार देण्यात आली मात्र चार महिने लोटुनही कोणतीही चौकशी व कार्यवाही करण्यात आलेली नाही, म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांनी थेट जिल्हाधिकारी यांना बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस आले.
प्रमुख मागण्या (१) गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. (२) महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. (३) बोगस अप्रोलची चौकशी करण्यात यावी. (४) जिजामाता हायस्कूल ईरुपटोला येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा आरोप करीत मागण्यासह त्यांनी आज दुपारी १ वाजता पासुन बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.