गोंदिया, सडक/ अर्जुनी, दिनांक – 06 जुलै 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड , बोपाबोडी जंगल शिवारात एका अज्ञात इसमाचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर येत आहे, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सौन्दड राष्ट्रीय माहामार्गा वरील ग्राम बोपाबोडी फाट्या वरून अवग्या 1 किमी अंतरावर असलेल्या जंगल परिसरातील एका अज्ञात इसमाची हत्या करून त्याला जमिनीत पुरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सौन्दड वन विभागाच्या गट नबर 1188 मधील ही घटना असल्याची माहिती आहे, मृतदेह 12 दिवस पूर्वीचा असल्याची माहिती आहे, या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचे पोलिश अधीक्षक, उपविभागीय पोलिश अधिकारी, एल सी बी टीम, गोंदिया शहर पोलिश , महसूल विभाग, स्वान पथक डुग्गीपार पोलिश व अन्य कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत घटना स्थळी दाखल झाले आहेत.