महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ ! राष्ट्रवादीचा एल्गार


  • माजी आमदार श्री राजेंद्र जैन तथा जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध! मोर्चा आंदोलन.


गोंदिया, प्रतिनिधी, दिनांक – ०५ जुलै २०२१ – पेट्रोल डीझेल दरवाडी चा निषेध ! गॅसचा दरवाडी चा निषेध ! केंद्र सरकारच करायच काय खाली डोक वर पाय, अशा अनेक घोषणांनी आज (दि ५ जुलै) गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दणाणून सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते, वाढलेले गॅस , पॅट्रोल, डीझेल व खाद्य तेला चे दर यामुळे वाढत चाललेली महागाई याच्या निषेधार्थ ! राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा यांच्या कडून परम पूज्य डॉ बाबा साहेब आंबेडकर प्रतीमा समोरील परिसरात, गोंदिया येथे महागाईचा विरोधात आंदोलन छेडले होते.

परम पूज्य डॉ बाबा साहेब आंबेडकर च्या प्रतीमेला माल्यार्पण करून मोर्चा ची सुरुवात केली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार श्री राजेंद्र जैन तथा जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आंदोलनाची सुरवात सायकल मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करीत जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी बोलताना श्री जैन म्हणाले कि, केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज सातत्याने महागाई वाढत आहे कालच घरगुती गॅसच्या किमती २५ रुपयांनी वाढल्या आहेत , तर पॅट्रोलचे दर तब्बल १०६ रुपयांवर पोहचले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे,  जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून हातातला रोजगार हिरावुन घेतला. अशा अनेक बाबींनी सामान्य माणूस ,मजूर, कष्टकरी,छोटे मोठे व्यापारी यांची अक्षरशः वाताहात झाली आहे, यामुळे या सरकारचा करावा तेवढा निषेध ! कमीच असल्याची भावना यावेळी श्री जैन यांनी व्यक्त केली.

या सोबतच पक्षातील वरिष्ठ मान्यवर विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, सुनील भालेराव, सुशीला भालेराव, प्रभाकर दोनोडे, के. बी. चौहान, अशाताई पाटील, कुंदा दोनोडे व सुनील पटले यांनी केंद्र सरकारने सातत्याने वाढवलेल्या महागाईचे विरोधात मार्गदर्शन केले. गोंदिया जिल्ह्यातील तालुका निहाय झालेल्या या आंदोलनात घोषणा व निदर्शन करीत तर विविध ठिकाणी गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून सर्व ठीकाणी हि आंदोलने करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवी मुंदडा यांनी केले तर गणेश बरडे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, सोबत सर्वश्री जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तूरकर, प्रभाकर दोनोडे, किशोर तरोणे, केतन तुरकर, गणेश बरडे, रफिक खान, सुनील भालेराव, सुशीला भालेराव, बाळकृष्ण पटले, के. बी. चौहान, अशोक शहारे, शिव शर्मा, मनोहर वालदे, मोहन पटले, सुरेश हर्षे, कमलबापू बहेकार, चुन्नीभाऊ बेंद्रे, राजेश कापसे, गोविंद तुरकर, रवी मुंदडा, सतीश देशमुख, विनीत सहारे, विजय रगडे, प्रतीक भालेराव, नानू मुदलियार, जितेश टेभरें, अखिलेश सेठ, जुनेद शेख, सायमा खान, शैय्याद इकबाल, रमेश कुरील, रजनी गौतम, रमेश गौतम, नितीन टेभरे, खालिद पठाण, प्रदीप रोकडे, करण टेकाम, विष्णू शर्मा, छोटू रामटेककर.

राजेश भक्तवर्ती, शैलेश वासनिक, सुनील पटले, उषा मेश्राम, सुदर्शना वर्मा, रमेश ठवरे, हरबक्ष गुरुनानि, एकनाथ वाहिले, संजीव राय, चंद्रकुमार चुटे, सौरभ रोकडे, जिम्मी गुप्ता, रमण उके, बद्दू पठाण, नागो बन्सोड, झलक बिसेन, तीर्थराज हरिणखेडे, सतीश कोल्हे, श्रीधर चन्ने, कालू चौहान, इकबाल भाई, लतीफ भाई, योगेश मामा बन्सोड, शकील कुरेशी, पंकज चौधरी, विनायक शर्मा, कुंदा दोनोडे, विष्णू शर्मा, पुस्तकला माने, सौरभ जैस्वाल, नसरुद्दीन अगवान, निर्वाण बालधरे, विक्की टेकाम, शरद गिजरे, प्यारे भाई, विजय डोंगरे, राजेश पाचे, महेश भलावी, मदन लिल्हारे, राजेश नागपुरे, बाबा पगरवार, भुवन हलमारे, अजय जभरे, आशिष ठाकूर, राजेश माने, हरी मरठे, अशोक बर्वे, फागुलाल नागफासे, विनायक शर्मा, शरद मिश्रा, प्रेमलाल टेभरें, रमेश राहगडाले, संदिप पटले, सुरेश चुटे, झनकलाल ढेकवार, रामेश्वर चौरागडे, भुनेश्वर कवाडे, पूरण उके, कृष्णकुमार जयस्वाल, गुलाब नागदेवे, कृष्णा भंडारकर, मिलिंद नागदेवे, संतोष लिल्हारे, नाजीम खान, लव माटे, नत्थू सिंग भाटिया, सुलभ तुरकर, महेंद्र रंगारी, अहमद भाई, काशीस चंद्रिकापुरे, विक्रांत तुरकर, सुरेश कवाडे, नीरज उपवंशी, एकता मेश्राम, दुर्योधन मेश्राम, राजू एन. जैन, मिलिंद नागपुरे, आरजू मेश्राम.

हर्षवर्धन मेश्राम, सियाराम मंडाले, राजेश नागपुरे, गुड्डू बिसेन, मदन चिखलोंडे, कृष्णा टकरेले, कोमल नांदगावली, दिनेश हरिणखेडे, ज्ञानेश्वर पगारवर, मोनू मेश्राम, कान्हा बघेल, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, नागेंद्रनाथ चौबे, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे, मुन्नालाल चौरागडे, योगराग गौतम, राजेश नागपुरे, दुर्गेश उपवंशी, सुरेश चुटे, धर्मु टेकाम, वामन गेडाम, मंगेश रंगारी, अरविंद गणवीर, कमल बोरकर, अमन घोडीचोर, गोल्डी बोरकर, अनुराग बोरकर, लक्की रंगारी, शुभम कोल्हटकर, महेंद्र लिल्हारे, नितीन मेश्राम, गोल्डी मेश्राम, अनिल शेंडे व पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment