स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही – जयंत पाटील यांचा काँग्रेस ला टोला.


उस्मानाबाद, वृत्तसेवा – काँग्रेस स्वबळाचा आग्रह धरत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करतील पण काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही, अशी टीका करत काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (२४जून) तुळजापुरात केलं. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते.

जयंत पाटील यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत उस्मानाबादमधून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला, तुळजाभवानी मातेची आरती आणि दर्शन घेऊन त्यांनी परिवार संवाद यात्रेला आजपासून (२४जून) ला सुरुवात करण्यात आली.

“भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र मंदिर उघडल्यानंतर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सापडेल. कोरोना असल्याने पक्षप्रवेश होऊ शकले नाही, असं देखील जयंत पाटील यावेळी म्हणाले. पक्ष सोडून गेलेले आता माघारी येण्यास उत्सुक आहेत, पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आता निर्णय घेतला जाईल आणि टप्याटप्याने प्रवेश दिला जाईल” असंही पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय.

तर कोरोनाचे संकट टळावे, पावसाळ्यात महाराष्ट्रामध्ये पूरसंकट येऊ नये, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीला हे साकडे घातले आहे. तर दुसरीकडे मंदिर बंद असल्याने तुळजाभवानी मंदिराच्या दारातूनच जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतले.

जयंत पाटलांच्या या परिवार संवाद यात्रेत मात्र सोशल डिस्टन्ससिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पहायला मिळालय यात्रेनिमित्त जयंत पाटील दोन दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. तुळजाभवानीचे दर्शन घेताना अनेक कार्यकर्ते एकत्रित आल्याने कोरोना नियमांची पायमल्ली झालीये.

  • नाना पटोले दौऱ्यानिमित्त म्हणाले

येत्या काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे काय चुकीचे आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुन्हा एकदा नारा दिलाय.

केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेकांना मुद्दाम त्रास दिला जात आहे. इन्कम टॅक्स आणि ईडीचा वापर राजकीय दबाव टाकण्यासाठी केला जातो, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या पत्राने ते समजलं आहे, असं जयंत देखील जयंत पाटील उस्मानाबाद मध्ये बोलत होते.


 

Leave a Comment