…नाना पटोले, अजित पवारांना संधी येत्या तीन वर्षातच मुख्यमंत्री व्हावे – रावसाहेब दानवे


मुंबई, वृत्तसेवा, दिनांक – 16 जून 2021 – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली होती. त्यावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या सर्व प्रकरणात आता भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केल्याचे वृत्त आज थोडक्यात ने प्रसारित केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधल्या पक्षांनी ग्रामपंचायतीमध्ये जसं लोक सरपंचपद वाटून घेतात, तसंच मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं, असा खोचक टोला महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. तसेच येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची नाना पटोले यांच्यासह अजित पवारांना संधी आहे. त्यामुळे त्यांनी येत्या तीन वर्षातच मुख्यमंत्री व्हावे, त्यासाठी शुभेच्छा देखील रावसाहेब दानवे यांनी दिल्या आहेत.

रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टिकेनुसार महाविकास आघाडीकडे फक्त तीनच वर्ष सत्ता उपभोगण्याची वेळ आहे, असं या वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात आता नाना पटोले यांनी अजित पवार नेमकं काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना व काँग्रेसमध्ये अनेक शाब्दिक चकमकी होत असताना गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता भाजप महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे.


 

Leave a Comment