( फोटो क्रेडिट गूगल )
चंद्रपूर, वृत्तसेवा, दिनांक – 16 जून 2021 – चंद्रपुरात भाजपने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मागील आठवड्यात आपल्या दौऱ्यात चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रपूर मनपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पटोले यांनी केला होता.
या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करताना काही भाजप BJP नगरसेवकही आपल्याला भेटल्याचा दावा पटोले यांनी केला होता. या वक्तव्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने हा दावा खोडून काढत पुराव्यानिशी नावे द्या, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
भाजप नगरसेवकांचा वक्तव्यात समावेश केल्याने मनपात सर्वच नगरसेवकांकडे संशयाने पाहिले जात असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसात ही तक्रार देण्यात आली आहे, असे भाजपने म्हटले आहे, असे वृत्त saam tv ने 15 जून रोजी प्रकाशित केले आहे.