गोंदिया, दिनांक : ०२ जानेवारी २०२२ : “कम्युनिटी पोलीसिंग” च्या माध्यमातून अतिसंवेदनशील, नक्सलग्रस्त, भागातील ग्राम- पळसगांव, व बोंडे येथील जिल्हा परिषद शाळा, येथे नक्सलग्रस्त आदिवासी बहुल भागातील विद्यार्थांचे प्रमाण जास्त असुन सदर शाळेतील विद्यार्थी यांचे मध्ये जनजागृती व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने व गोंदिया पोलीस दलाबद्दल सहानभूतीचे वातावरण निर्माण व्हावे, म्हणून दि ३१ डिसेंबर रोजी सदर शाळेस भेट देण्यात आली. या भेटी प्रसंगी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांनी चांगली नीतिमूल्ये व शिस्त, स्वच्छता, सामाजिक विकास तसेच स्पर्धा परीक्षेस पूरक वातावरण शाळेत तयार करण्यात यावे याबाबत मार्गदर्शन केले.
तद्नंतर शालेय मुला मुलींना गोंदिया पोलीस दलाकडून शालेय मुलांस स्कूल बॅग, exam pad, टिफिन बॉक्स, वॉटरबॉटल, ड्रॉविंग बूक, कलर पेन, रजिस्टर, हसुरे इंग्लिश बूक, इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. व जिल्हा परिषद शाळेस व्हाईट बोर्ड व मार्कर पेन देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुस्तोडे सर, श्री चनाप सर, सरपंच श्री धानगाये व पोलीस पाटील- पिपरे व इतर सहकारी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते. “कम्युनिटी पोलीसिंग च्या माध्यमाने जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन पोलीस ठाणे चिचगड चे प्रभारी सपोनि. शरद पाटील, स. दु. क्षेत्र बोन्डे, चे प्रभारी पो. उपनी राहुल दूधमल, व देवरी पोलिसांचे सौजन्याने करण्यात आले. या वेळी ग्राम-पळसगाँव जि. प. शाळेचे मुख्याध्यापक कुस्तोडे यांनी पोलीस विभागाचे या उपक्रमाबद्दल आभार मानलेत.