वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांना पोलिसांचा दणका


गोंदिया, दिनांक : ०२ डिसेंबर २०२२ : वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या, वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर विषेशतः विना लायसन्स वाहन चालविणारे वाहन चालक, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विना सीट बेल्ट, कर्न- कर्कश हॉर्न वाजविणारे , अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करणे, पोलीसांचा ईशारा न पाळणे, ईत्यादि वर कारवाई करून 362 पेड केसेस, 358 अनपेड केसेस अश्या एकूण- 720 वाहतूक कारवाया करण्यात आलेल्या असून 3, 67, 600 रू शुल्क आकारण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वाहतूक पोलीस वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट, मॉडिफाइड सायलेन्सर लावणाऱ्या वाहनांचे नंबरप्लेट, व सायलेन्सर काढून घेण्याची व जप्त करण्याची प्रक्रिया राबवून घेत आहेत. सदरची कारवाई वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक महेश बनसोडे, यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, व पथक यांनी केली आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, जनतेनी रहदारीचे व वाहतुकीचे नियम पाळावे व संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पोलीस दलास वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे.


 

Leave a Comment