सडक/अर्जुनी, गोंदिया, दींनाक: 15 जुलै 2022 : सौदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 जुलै 2022 ला जय ‘बजरंग सांस्कृतिक सभागृह’ बाजार चौक, सौंदड येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून 97 वी रँक (IAS) प्राप्त करणारे शुभम अशोक भैसारे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन तसेच एस.एस.सी – 2022 परिक्षेत 99 टक्के गुण घेऊन विदर्भातून प्रथम क्रमांक पटकावणारे अमन रमेशचंद्र अग्रवाल यांना स्मृतिचिन्ह देऊन तसेच विद्यालयातून एस.एस.सी. व एच.एस.सी.- 2022 परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविनाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषचंद्र अग्रवाल, जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था, अशोक भैसारे से.नि. जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच मान्यवरांचे शुभहस्ते देऊन त्यांचा सत्कार, ससम्मान करण्यात आला.
तसेच मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत मंजूर 50 सायकलींचे वितरण कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथिंच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अशोक भैसारे-माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश, आ.न. घाटबांधे-संस्था उपाध्यक्ष, संस्था सदस्य सूरेशकुमार लोहिया, रामभाऊ झोडे, पंकज लोहिया, परेश लोहिया, विविध कार्य. सेवा सह. संस्थेचे अध्यक्ष प्रभुदयाल लोहिया, गायत्री इरले सरपंच, सौंदड, निशा तोडासे-जि. प. सदस्या, वर्षा शहारे,पं.स. सदस्या,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी थेर सर, रमेशचंद्र अग्रवाल, नरसिंग अग्रवाल, जगदीश जांभूळकर, अनिल मेश्राम सर, डॉ.गहाने, रुपालीताई टेम्भुरने, पुष्पाताई बडोले-माजी सरपंच, सुनील राऊत उपसरपंच सौंदड, अनिल दिक्षित-पो.पा. कोहमारा, प्रल्हाद कोरे, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, हेडमिस्ट्रेस संयुक्ता जोशी, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुभाषचंद्र अग्रवाल, माजी अध्यक्ष लो. शि. संस्था यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले. प्रमुख अतिथी संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया, यांनी “अच्छी शिक्षा किसी भी गाव की उज्वल भविष्य की पहचान होती है। शिक्षा के क्षेत्र मे जीवनभर योगदान देने का मेरा मानस है । ” अशी सदिच्छा व्यक्त करून “शुभमच्या यशातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रात आपल्या आवडीनुसार आपले करिअर करावे.” असे आवाहनही केले.
तसेच प्रमुख अतिथी अशोक भैसारे तसेच इतर मान्यवरांनी देखील गुरु पौर्णिमेचे महत्त्व समजावून देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सत्कारमूर्ती शुभम भैसारे (IAS) यांनी “यश संपादन करण्यासाठी ध्येय निश्चित करून वाटचाल करा व ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतांना नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल.” असे मार्गदर्शन केले. व अमन अग्रवाल यांनी आपल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांशी आपले परिश्रमाबद्दल अनुभव कथन केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून वारकरी दिंडीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाला संस्था, शाळा समिती, शाळा सुधार समिती, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य गण, पालक,विद्यार्थी, निमंत्रित पाहुणे व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु.यू. बी. डोये व श्री.डी. ए. दरवडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.