जवाहर नवोदयसाठी सौंदड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी सृष्टी कापगते ची निवड


सडक/अर्जुनी, गोंदिया , दींनाक : 15 जुलै 2022 : केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी देशभर प्रवेश पूर्व परीक्षा ३० एप्रिल रोजी घेण्यात आली होती. सदर निवड चाचणी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे जवाहर नवोदय विद्यालय समिती द्वारे नुकतीच जाहीर करण्यात आली.

यात स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सौन्दड येथील विद्यार्थिनी सृष्टी अनिल कापगते हिची इतर मागास विद्यार्थी ग्रामीण प्रवर्गात निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तिचा सत्कार करण्यात आला.

भेटवस्तू देऊन तिचे कौतुक करण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना तिने नियमित अभ्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन हेच आपल्या यशाचे गमक आहे असे सांगितले. तिच्या निवडीबद्दल जि.प. सदस्य निशा तोंडासे जनबंधू, पं.स. सदस्य वर्षा शहारे, सरपंच गायत्री इरले, शा.व्य. स. अध्यक्ष यशवंत फुंडे, केंद्रप्रमुख डी. झेड. लांडगे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Comment