महविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश!!


मुंबई, वृत्तसेवा, दीं. 11 जून 2022 : राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदान होते. यात कोल्हापूर दोन उमेदवार धनंजय महाडिक आणि संजय पवार या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला. अखेर यात धनंजय महाडिक यांचा विजयी झाला. यामुळे राज्यसभेत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर दुस-या बाजुला संजय पवार यांच्या पराभवाने महविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, भाजपची सहाव्या जागेसाठीची खेळी यशस्वी झाले आहे. मतमोजणीच्या पहिल्या संजय पवार यांना ३३ मते आणि धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या पसंतीमध्ये धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. तसेच भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे या दोघांना ४८-४८ मते मिळाली. या दोघांचाही पहिल्या फेरीत विजयी झाला. यामुळे यांच्या मतांचा फायदा धनंजय महाडिक यांना झाला. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत धनंजय महाडिक विजयी झाले.

तसेच राज्यसभा निवडणुकीत महविकास आघाडीचे शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत. भाजपकडे १०६ मते होती. त्या व्यतिरिक्त भाजपने महविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश आले. भाजपचा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वी केले आहे. फडणवीस म्हणाले, “”निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती. जय महाराष्ट्र!”


 

Leave a Comment