लाचखोर ! तलाठी एसीबी च्या जाळ्यात, जमीन ओलीत दाखविण्यासाठी मागितली लाच!


गोंदिया, दींनाक : २४ मे २०२२ : आरोपी मनोज दौलत कोहपरे, पद- तलाठी, साझा क. ३ पानगाव, ता. सालेकसा जि. गोंदिया यांने  तकारदाराकडुन तडजोडीअंती रु. ८०० लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

सदर प्रकरणी तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांचे मालकीची मौजा मुंडीपार ता. सालेकसा जि. गोदिया येथील शेतजमीन विक्री करीता सदर शेतजमीनीचा ७/१२, सिमांकण व नकाशाची आवश्यकता असल्याने तकारदार हे तलाठी कार्यालय पानगांव येथे जावून आरोपी तलाठी मनोज दौलत कोहपरे यांचेकडुन आपले जमीनीचा ७/१२ काढून घेतला व सदर जमीनीचा ७/१२ घेवून रजिष्टी कार्यालय सालेकसा येथे जावुन अर्जनवीस यांना ७/१२ दाखवीला व सदर शेतजमीनी पैकी ०.३२ हे. आर. जमीन विकायची आहे असे सांगीतले. त्यावर अर्जीनविस यांनी आपली शेतजमीन ओलीत नाही त्यामुळे सदर शेतजमीनी पैकी ०.३२ हे. आर. जमीनीची रजिष्ट्री होवु शकत नाही.

सदर शेतजमीन ओलीत असती तर रजिष्ठी झाली असती असे अर्जनविस यांनी सांगीतले त्यावर तक्रारदार यांनी माझी शेतजमीन ओलीत आहे परंतु आरोपी तलाठी यांनी ७/१२ मध्ये ओलीत दाखविलेली नाही. तेव्हा तकारदार परत तलाठी कार्यालय पानगांव येथे जावुन आरोपी तलाठी यांना भेटुन माझी शेतजमीन ओलीत असुन नहराचे पाण्याचे साधनाची आहे. परंतु आपण ७/१२ वर ओलीत दाखवीली नाही. तेव्हा तक्रारदार यांनी आरोपी तलाठी यांना विनंती करून माझी शेतजमीन ७/१२ वर ओलीत दाखवुन मला नवीन ७/१२ दया असे बोलल्यावर आरोपी तलाठी यांनी तक्रारदाराकडे शेतजमीन ७/१२ वर ओलीत दाखवुन नवीन ७/१२ देण्यासाठी १,०००/- रुपयेची लाच रक्कमेची मागणी केली. तकारदार यास आरोपी तलाठी श्री मनोज दौलत कोहपरे यांना सदर कामा करीता लाच रक्कम रु. १००० देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी आरोपी विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार नोंदविली.

प्रस्तुत सापळा प्रकरणी आज दि. २३.०५.२०२२ रोजी आरोपी मनोज दौलत कोहपरे यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीच्या योग्य पडताळणीअंती आरोपी विरुध्द तलाठी कार्यालय पानगांव ता. सालेकसा येथे लाचेचा यशस्वी सापळा रचण्यात आला. या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी तलाठी श्री मनोज दौलत कोहपरे यांनी तक्रारदाराकडे शेतजमीन ७/१२ वर ओलीत दाखवुन नवीन ७/१२ देण्यासाठी १,०००/- रुपयेची लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती रु. ८००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारुन गैरफायदा घेतला. त्यावरून आरोपी विरूध्द पो.स्टे. सालेकसा, जि. गोंदिया येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी राकेश ओला. पोलीस अधीक्षक मधुकर गिते अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनात पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस उपअधिक्षक, अतुल तवाडे, पोलीस निरीक्षक, पोहवा मिलकीराम पटले, संजय बोहरे, ना.पो.शि. राजेन्द्र बिसेन, मंगेश कहालकर, अशोक कापसे, संतोष शेंडे, संतोष बोपचे, चानापोशि दिपक बाटबर्वे सर्व लाप्रवि, गोंदिया यांनी केली.

नागरिकांना आव्हान करण्यात येते की, त्यांची लोकसेवका विरुद्ध तक्रार असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे खालील माध्यमाद्वारे संपर्क करावा. त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात येईल.

Toll Free No:- 1064

Helpline No :- 9168214101

Landline No :-07182/251203

Whatsapp No:- 9930997700

Website :- www.acbmaharashtra.gov.in

(पुरुषोत्तम अहेरकर)

पोलीस उपअधिक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोदिया.


 

Leave a Comment