पांढरी येथे चोरी करनारा आरोपी मोहाडीत अटक


सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : २३ मे २०२२ : पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीत दि. १३ मे रोजी ग्राम पांढरी येथे घरफोडी करुन सोन्याचे कानातील टॉप्स, लहान मोठे लॉकेट, सोन्याची नथ, नाकातील फुली, सोन्याचे पिटीव मनी, सोन्याचे मंगळसुत्र, कानातील रिंग, सोन्याचे आंगठया २ नग असा एकुण २५.५ ग्रॅम सोनाचा सामान एकुण किंमती १,१४,७५० रु.चा माल घेवुन पसार झालेल्या आरोपीविरुदध पोलीस स्टेशन डुग्गीपारला अपराध क्र. १०५/२०२२ कलम ४५७,४५४, ३८० भादवी अन्वये फिर्यादीच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुदध गुन्हा दाखल करण्यात आले.

गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे तपासाकरीता ठाणेदार सचीन वांगडे यांनी विशेष तपास पथक तयार करून पथकातील अमलंदार यांना गुप्त माहीतीच्या आधारे मोहाडी जि. भंडारा या ठिकाणी रवाना केले. पथकातील अमलंदार यांनी मोहाडी येथील घरफोडी गुन्हयातील आरोपीची माहीती घेवून त्याचा शोध घेवुन त्या आधारे मोहाडी जि. भंडारा येथील प्रविण अशोक डेकाटे वय २८ वर्ष याला ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केले असता त्यांचे कडुन गुन्हयात चोरी गेलेल्या २५.५ ग्रॅम सोने किमती अंदाजे एकुण १,१४,७५०/- रुपयाचा संपुर्ण माल आरोपीकडुन हस्तगत करण्यात आले आहे. आरोपी पोलीस अटकेत असुन पुढील तपास ठाणेदार सचिन वांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. सुभाष डोंगरवार, हे करीत आहेत.

सदर कारवाही विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया,  संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स.फौ. दिलीप सांदेकर, पो.हवा. सुभाष डोंगरवार, पोना. सचिन गेडाम, पोशि. सुनिल डहाके यांनी केली.


 

Leave a Comment