चन्दन तस्कर “पुष्पा” अखेर महाराष्ट्रात अटक! अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त!


सांगली, वृत्तसेवा, दींनाक – ३१ जानेवारी २०२२ – सध्या चर्चेत असलेले, आणि विविध भाषेत प्रदर्शित झालेले, पुष्पा चित्रपट आणि त्यातील अभिनय व रक्त चंदन सर्वांच्या मनात घर करून बसले आहे, अश्यात या चित्रपटाची पूनराउत्ती होणार आणि ती ही महाराष्ट्रात हे कुणाला वाटल नसेल, आपण जे वृत्त वाचत आहात हे ही वृत्त तितकच खरे आहे, आज मिरज गांधी चौकी पोलिसांनी ‌अडीच कोटींचे रक्त चंदन जप्त केले आहे, १ टन वजनाचे ३२ वोडके असून रक्त चंदन बेंगलोर येथून एका टेम्पोतून ही तस्करी झाल्याचे दरम्यान पोलिसांनी सांगितलं आहे, टेम्पो नंबर के.ए. २३ – ६९०० असी पोलिसांनी  माहिती दिली आहे, कोल्हापूर च्या दिशेने जात असताना हे रक्त चंदन मिरज धामणी रोडच्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केले.

ही कारवाई महात्मा गांधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे आणि महात्मा गांधी पोलीस चौकीच्या स्टाफनेही कारवाई केली आहे, या प्रकरणामुळे आंतरराज्य टोळीचे रँकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे, असे ही पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगितले आहे, आरोपी यासीन ईनायतुल खान यास महात्मा गांधी पोलिसांनी अटक केली असून पश्चिम महाराष्ट्रातील महात्मा गांधी पोलीस ठाण्याची ही मोठी कारवाई आहे, या मध्ये एक गाडी, रक्त चंदन सहीत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी दिली आहे, मिरज महात्मा गांधी पोलीस चौक मध्ये प्रेस काॅन्फरंन्स घेऊन माहिती दिली आहे.


 

Leave a Comment