सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक – ३१ जानेवारी २०२२ – तालुक्यातील ग्राम कोसमतोंडी येथील वयोवृद्ध प्रतिष्ठीत नागरिक जगन्नाथ नशिने यांचे वयाचे ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने ३० जानेवारी च्या रात्री ०८ वाजता निधन झाले. जगन्नाथ नशिने जनसंघापासून भारतीय जनता पक्षाचे कर्मठ कार्यकर्ते होते. त्यांनी तंटामुक्तीचे अध्यक्ष पदसुद्धा भुषविले होते, कोसमतोंडी येथील भारतीय जनता पक्षाचे वयोवृद्ध प्रतिष्ठीत कर्मठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती, त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, मुली व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे, आज त्यांच्या पार्थिवावर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार संपण झाले, यावेळी भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.