…अन् आमदार घायमोकळून ढसा ढसा रडले!


गोंदिया, दींनाक – ३१ जानेवारी २०२२ – तिरोडा विधान सभेचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुला सह तब्बल सात मुलांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता, रविवारी (दि.३०) केंद्रीय मंत्री नितींगडकरी यांनी आमदारांच्या नीवास्थानी भेट दिली दरम्यान आमदार विजय रहांगडाले घायमोकळू ढसा ढसा रडु लागले,  २५ जानेवारी रोजी गाडी पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. वर्धा-देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून कार ४० फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश होता.

रहांगडाले यांना पुत्रशोक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन सर्वांची भेट घेतली, वर्धा-देवळी मार्गावर मागील मंगळवारी झालेला अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच आपघातानंतर रहांगडाले यांना सांत्वन भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरी भेट देत आहेत. रविवारी नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबियांची सपत्नीक भेट घेतली, या घटने बाबद सविस्तर चौकशी करण्याचे आदेश यंत्रणेला देणार असून अपघातामधील नेमक काय कारण आहे, ते सोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडकरी भेटी दरम्यान बोलत होते.


 

Leave a Comment