सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सेवकांचा कामबंद आंदोलन, आंदोलनात जिल्ह्यातील ८ तालुक्याचा समावेश.


  • ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका ग्रामवासियांना बसणार, वेळेत मिळणारे दाखले होणार बंद.

येथे व्हिडिओ बातमी पहा.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक २४ ऑगस्ट २०२१ – गोंदिया जिल्ह्याच्या ०८ हि तालुक्यातील ग्राम सेवकांनी ०२ ऑगस्ट पासून १ ते २६ मागण्यांना घेऊन काम बंद आंदोलन पुकारल आहे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ( सलग्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ ) जिल्हा शाखा गोंदिया च्या वतीने दिनांक – १३/०७/२०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना संघटनेच्या वतीने ग्रामसेवक वर्गावर होणारे अन्याय दूर करून विविध मागण्यांची पूर्तता करणे संबंधाने असहकार आंदोलन पूर्व सूचना पत्र देण्यात आले होते.

मात्र या पत्रावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने दिनांक – ०२ ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालया समोर साकळी उपोसन सुरु करण्यात आले, तर दिनांक – १६ ऑगस्ट पासून संपूर्ण काम बंद आंदोलन करण्यात आले, प्रशासनाच्या वतीने आंदोलन कर्त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यास ३० ऑगस्ट पासून ग्राम पंचायत कार्यालयाच्या आलमारीला कुलूप लाऊन चाब्या व सिक्के खंडविकास अधिकारी यांना सोपुन पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्याचा ईशारा पत्रातून ग्राम सेवक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

संघटनेच्या वतीने ०१ ते २६ मागण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आला आहे, त्यात म्याट ने दिलेल्या निर्णयानुसार निलंबित कर्मचार्यांना ९० दिवसा पेक्षा ज्यास्त वेळ निलंबित ठेऊ नये, ग्राम विकास अधिकारी गणेश हरडे यांचे प्रकरण,  पदोन्नती प्रकरण निकाली काढणे, कालबद्ध पदोन्नती करणे, करोना काळात मृत्यू झालेल्या ग्राम सेवकांचे प्रस्थाव शासनाला पाठविणे, सह अन्य मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन पुकारला आहे, जिल्हा अध्यक्ष कार्तिक चोव्हान, जिल्हा सचिव दयानंद फटिंग, विभागीय सचिव कमलेश बिसेन, व अन्य कार्यकारणीच्या पदाधीकार्यांच्या नावाचे लेटर हेडवरून निवेदन देण्यात आले आहे,  प्रशासनाने ग्रामसेवकांच्या मागण्या वेळीच पूर्ण न केल्यास ग्राम पंच्यात कार्यालयातून मिळणारे दाखले बंद होतील त्या मुळे सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावे लागणार आहे, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


 

Leave a Comment